esakal | संजय राऊत सहकुटुंब 'सिल्व्हर ओक'वर, कौटुंबिक की राजकीय भेट? 
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊत सहकुटुंब 'सिल्व्हर ओक'वर, कौटुंबिक की राजकीय भेट? 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.

संजय राऊत सहकुटुंब 'सिल्व्हर ओक'वर, कौटुंबिक की राजकीय भेट? 

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या निवासस्थान सिल्व्हर ओकवर संजय राऊत गेले होते. संजय राऊत सहकुटुंब राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला  पोहोचले होते. ही भेट कौटुंबिक की राजकीय, हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. 

जेव्हा जेव्हा शिवसेना खासदार संजय राऊत सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतात, तेव्हा तेव्हा राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होतो. त्यामुळे राऊत-पवारांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली आणि या भेटीमागचं नेमकं कारण काय याची सर्वांनाच उत्सुकता लागलीय. राऊतांनी मात्र भेट कौटुंबिक होती असं म्हटलं आहे. संजय राऊत यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ही भेट कौटुंबिक भेट असल्याचं सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांना ट्रागेट करू दे पण त्यांचा काही फरक पडत नाही, असंही राऊत म्हणालेत. 

काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर वर्षा राऊत यांची दोनदा चौकशीही झाली. 

हेही वाचा- भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंच्या मागे पुन्हा ईडी, आज होणार चौकशी

Sanjay Raut met Sharad Pawar at Silver Oak With family member