

Sanjay Raut statement on sharad pawar
esakal
Maharashtra Political News : राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणाला नवे वळण लागले आहे. मात्र, अजित पवार यांच्या निधनातून राज्य सावरत आहे तोवर सुरू असलेल्या राजकीय हालचालींवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी तीव्र टीका केली आहे. या सर्व घडामोडींना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.