
शिवसेना ठाकरे गटाचा ठाण्यात कार्यकर्ता मेळावा आहे. या मेळाव्याआधी ठाण्यात आनंद आश्रमात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं. यानंतर आनंद आश्रमाबाहेर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटात राडा झालाय. राऊतांच्या स्पर्शामुळे दिघेंचा पुतळा अपवित्र झाल्याचं म्हणत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी दिघेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजीही केली.