sanjay raut
esakal
मुंबई
संजय राऊतांना कर्करोगाचं निदान, ऐन दिवाळीत किमोथेरपी; म्हणाले, पहिल्यांदा समजलं तेव्हा हसू आलं
Sanjay Raut Health Updates : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या आजारपणाबद्दल मोठे अपडेट दिले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ऐन दिवाळीत कर्करोगाचं निदान झाल्याचं त्यांनी सांगितलंय.
शिवसेना उद्धव टाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मधल्या काळात प्रकृतीच्या कारणास्तव विश्रांती घेतली होती. २०२५ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून राऊत माध्यमांसमोर आले नव्हते. आता त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. संजय राऊत यांनी स्वत:च कर्करोगाचं निदान झालं होतं अशी माहिती दिली आहे. दिवाळीच्या दोन दिवस आधीच कर्करोगाचं निदान झाल्याचं त्यांनी सांगितलंय.
