सामूहिक विवाह सोहळ्यातच नवविवाहित जोडप्यांनी केला..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

भिवंडी : केंद्र सरकारने एनआरसी (NRC) आणि सीएए (CAA) कायदा लागू केल्यापासून भिवंडी शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून विविध संघटनांच्या माध्यमातून या कायद्याविरोधात तीव्र निदर्शने व आंदोलने होत आहेत. असं असताना काल शहरातील कल्याण रोड भागात आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह ( निकाह ) सोहळ्यात नवं जोडप्यांनी एनआरसी व सीएए कायद्याला विरोध करण्यासाठी आपल्या हाताला निषेधाचे बॅचेस लावून या कायद्याला अनोख्या पद्धतीने विरोध दर्शविला 
आहे.

जाणून घ्या - 'लव्ह रूम' बद्दल ऐकलंय का ?

अरे बापरे - मुंबईत ९० रुपयात विकला जातोय मृत्यू

नवविवाहित जोडप्यांनी आपल्या सामुदायिक लग्नाच्या दिवशीच केलेल्या या अनोख्या आंदोलनाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. शहरातील कल्याण रोडवरील लकडा मार्केट नवीवस्ती येथे काल हुसैनी एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष दिन मोहम्मद शाह मोहम्मद खान यांच्या पुढाकाराने मुस्लिम समाजातील आर्थिक दुर्बल घटकांमधील युवक युवतींसाठी सामूहिक निकाह (विवाह) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

धक्कादायक - शिक्षित लोकचं करतात 'हे' कृत्य, त्यांनी व्यक्त केली खंत..

मोठी बातमी - ठाकरे सरकार न्याय मिळवून देणार का ?

दरवर्षी या सामूहिक विवाह सोहळ्याचे संस्थेच्यावतीने आयोजन करण्यात येत असून यावर्षी या सामूहिक विवाह सोहळ्याचे हे नववे वर्ष असून या सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण 25 जोडप्यांचे विवाह संपन्न झाले. या जोडप्यांना संस्थेच्या माध्यमातून संसारोपयोगी साहित्य देखील देण्यात आले. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याप्रसंगी नवविवाहित जोडप्यांनी आपल्या हाताच्या दंडाला एनआरसी कायद्याचा विरोध दर्शविणारे बॅचेस लावल्याने हा सामूहिक विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या अनोख्या पद्धतीने एनआरसी व सीएए कायद्याविरोधात या नवं जोडप्यांनी केलेल्या आंदोलनाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.  

couples in mass marriage opposes NRC and CAA on their wedding day

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: couples in mass marriage opposes NRC and CAA on their wedding day