आजही केलंय संजय राऊतांनी हटके ट्विट!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 November 2019

बाळासाहेबांची पुण्यतिथी झाल्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा राऊत यांनी ट्विट केले आहे. दररोज काही ना काही हटके ट्विट करणाऱ्या राऊत यांनी आजही ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मुंबई : सत्तास्थापना होईपर्यंत दररोज सूचक ट्विट करण्याचा चंगच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बांधला आहे. काल (ता. 17) बाळासाहेबांची पुण्यतिथी झाल्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा राऊत यांनी ट्विट केले आहे. दररोज काही ना काही हटके ट्विट करणाऱ्या राऊत यांनी आजही ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सत्तास्थापनेसाठी आता केंद्र दिल्ली; सोनिया गांधी-शरद पवार यांच्यात चर्चा 

आज (ता. 18) संजय राऊत यांनी कवी हबीब जालिब यांच्या कवितेतील चार ओळी ट्विट केल्या आहेत. 'तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था - हबीब जालिब' असे ट्विट करत संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपला टोला लगावला आहे. भाजपला बहुमतात येऊन सत्तास्थापनेचा विश्वास होता, मात्र त्यांना 105 जागा मिळाल्याने व शिवसेनेने त्यांची कोंडी केल्याने सत्ता स्थापन करू शकले नाहीत. त्यामुळे मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांनाच हा टोला असेल की काय, अशी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यासाठी संजय राऊत दिल्लीला गेले आहेत. आजचे ट्विट त्यांनी थेट दिल्लीहून केले आहे. सत्तास्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नसताना फक्त चर्चा सुरू आहे. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना मिळून सत्ता स्थापन करतील अशीही चर्चा सुरू आहे. आज शरद पवार दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतील, त्यानंतर सत्तासमीकरणे काय असतील याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.  

शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Raut tweet on 18 November