ई़़डी कार्यालयानंतर भाजप कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी लावले बॅनर

ई़़डी कार्यालयानंतर भाजप कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी लावले बॅनर

मुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस  पाठवली.  आता ईडीच्या या समन्सवरुन शिवसेना आणि भाजपा पुन्हा आमने-सामने आली आहे. त्यात शिवसैनिकही भलतेच अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत.  नोटिस पाठवल्यानंतर  कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंमलबजावणी संचनालयाच्या कार्यालयासमोरच ‘भाजप प्रदेश कार्यालय’असे बॅनर लावले. आज भाजपच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी बॅनर्स लावलेत.

मुंबईतील भाजप प्रदेश कार्यलयाबाहेर शिवसैनिकांनी सोमवारी रात्री होर्डिंग लावलेत.  ED येथे भाजप विरोधी लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात. अशा आशयाचे होर्डिंग भाजप मुख्यलायाबाहेर लावण्यात आलेत.  सोमवारी दुपारी शिवसैनिकांनी  मुंबईतील ईडीच्या कार्यालया बाहेर न'भाजप प्रदेश कार्यालय' असं सांगत बॅनरच लावले  होते.

संजय राऊत यांची ई़़डी आणि भाजपवर टीका 

मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल, तो राहणार नसल्याचा इशारा राऊतांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला आहे. तसंच ईडीकडे ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मी अद्याप नोटिस पाहिलेली नाही. नोटीस माझ्या नावावर नाही. मला नोटीस पाहण्याची गरज नाही. हे सगळं राजकारण कसं चालतं मला माहिती आहे, त्यामुळे हे सुरु राहू दे आम्ही उत्तर देऊ, असंही त्यांनी सांगितलं. ईडी ही सरकारी संस्था आहे. सरकारी कागदपत्रांकडे कानाडोळा करु शकत नाही, भले कायद्यावर कोणाचाही दबाव असला, तरी आम्ही कायदे मानतो. कायद्यांचं पालन करतो, असंही बोलायला राऊत विसरले नाहीत. 

हे राजकारण कसं सुरु आहे, ते मला माहिती आहे, ते चालू द्या, मला त्यात पडायचं नाही, असं म्हणत देशात आजही कायदा असून त्याचा सन्मान केला पाहिजे. देशात सध्या इतर कोणतीही मोठी गोष्ट नाही. मी १२० जणांची यादी दिल्यानंतर कदातिच ईडीकडे खूप काम येईल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Sanjay raut wife ed notice Shivsena banner outside bjp office mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com