बेस्ट संपाची संजय राऊतांकडून खिल्ली; गाणी 'बेस्ट' आहेत (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

बेस्ट कर्मचाऱ्यांकडून गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या संपाची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडविली आहे. 'ठाकरे' चित्रपटाच्या म्युझिक लाँचवेळी सामच्या प्रतिनिधीने बेस्टच्या संपाबाबत विचारले असता या चित्रपटाचे संगीत बेस्ट झाल्याचे म्हटले आहे.

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांकडून गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या संपाची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडविली आहे. 'ठाकरे' चित्रपटाच्या म्युझिक लाँचवेळी सामच्या प्रतिनिधीने बेस्टच्या संपाबाबत विचारले असता या चित्रपटाचे संगीत बेस्ट झाल्याचे म्हटले आहे.

आज (शनिवार) 'ठाकरे' चित्रपटाच्या म्युझिक लाँचवेळी सामच्या प्रतिनिधीने संजय राऊत यांना बेस्ट संपाबाबत विचारल्यानंतर ते म्हणाले की सिनेमा बेस्ट झाला आहे आणि चित्रपटाचे संगीतही बेस्ट आहे. राऊत यांनी असे उत्तर दिले असता उपस्थितांमध्ये हशा पिकला.  

बेस्ट उपक्रमाच्या 27 आगारांमध्ये कामगारांनी चार दिवसांपासून ठिय्या दिला आहे. बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल होत असताना शिवसेना मात्र या प्रश्‍नावर टोलवाटोलवी करत असल्याचे चित्र आहे. न्यायालयाने कान उपटल्यानंतर राज्य सरकारकडून संपावर तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. राज्य सरकारने अनुदान देण्याची मागणी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केली. मात्र, मुंबई महापालिका राज्य सरकारपेक्षा अधिक श्रीमंत आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्टला आर्थिक मदत देण्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay rauts Ridicules comment on Best strike