esakal | राज्यातील मंदिरं खुली करण्याबाबत संजय राऊतांचं 'मोठं' विधान, काँग्रेसबाबत राऊत म्हणालेत...
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील मंदिरं खुली करण्याबाबत संजय राऊतांचं 'मोठं' विधान, काँग्रेसबाबत राऊत म्हणालेत...

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील मंदिरं कधी खुली करण्यात येतील असा सवाल त्यांना विचारण्यात आला.

राज्यातील मंदिरं खुली करण्याबाबत संजय राऊतांचं 'मोठं' विधान, काँग्रेसबाबत राऊत म्हणालेत...

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई - मार्च महिन्यापासून देशावर घोंगावणारं कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण दररोज सापडतायत. मुंबई बाबत बोलायचं झालं तर मुंबईतील परिस्थिती आवाक्यात जरी असली तरीही कोरोनाची टांगती तालावर मुंबईवर अद्याप आहेच. अशात मुंबईच्या आसपासच्या  उपनगरांमध्ये कोरोना प्रमाण आटोक्यात असल्याचं चित्र आहे.

कोरोना लॉकडाऊन लागल्यापासून, म्हणजे गेले अनेक महिने बंद असलेली मंदिरं खुली करण्याची मागणी आता जोर धरतेय. येत्या काळात मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन देखील केलं जाणार आहे. दरम्यान राज्यातील मंदीरं खुली करण्याबाबत आज संजय राऊत यांनी सूचक संकेत दिलेत. 

मोठी बातमी : नॉन कोविड रूग्णांची मोठ्या रूग्णालयांकडे पाठ, जाणून घ्या त्या मागचं नेमकं कारण

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील मंदिरं कधी खुली करण्यात येतील असा सवाल त्यांना विचारण्यात आला. यावर राज्य सरकारकडून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विचार होऊ शकतो, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलंय. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी जिम बाबतचाही निर्णय सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो असं म्हटलंय.  

संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला तेंव्हा राऊतांनी विविध मुद्द्यांवर आपलं मत मांडलं. काँग्रेसमध्ये जे घडलं त्यावर काँग्रेस नेत्यांनी बोलायला हवं , मी काय बोलू अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. काँग्रेस विरोधी पक्ष आहे. अनेक वर्ष कॉग्रेस सत्तेत होता. काँग्रेसने अनेक वर्ष या देशाला प्रधानमंत्री दिलेले आहेत. मला असं वाटतं देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. काँग्रेस आजही गाव गावात असल्याने काँग्रेसने वादळातून सावरत पुन्हा काम सुरु करावं असं मत राऊत यांनी मांडलं.   

sanjay rauts statement on decision regarding opening temples in the state