
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सामाजिक न्याय खात्याचे मंत्रिपद भूषवत असतानाही ‘सिडको’ महामंडळाच्या अध्यक्षपदावरून स्वतःहून पायउतार न झाल्याने राज्य सरकारने अखेर संजय शिरसाट यांना ‘सिडको’च्या अध्यक्षपदावरून हटविले आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.