
Trupti Desai Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवंनवे खुलासे होत आहेत. यात आता सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांची एन्ट्री झाली आहे. देसाई यांनी याप्रकरणात अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसंच याप्रकरणात मोक्का लावण्यात आलेला आरोपी वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी प्रयत्न चालले असल्याचा दावा केला आहे. यामागे दिंडोरीच्या आश्रमाचे प्रमुख आण्णासाहेब मोरे ऊर्फ गुरुमाऊली यांचा संबंध असल्याचे पुरावे आपल्याकडं असल्याचं म्हटलं आहे.