
Latest Thane News: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे, असे तीन आरोपी हत्याकांडानंतर सर्वप्रथम भिवंडीत आश्रयाला आले होते. त्यांनी बीड येथील मूळ रहिवासी सध्या भिवंडीत वास्तव्यास असलेले विक्रम डोईफोडे यांचा पत्ता विचारला होता. याप्रकरणी बीड येथील सीआयडी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक तपासणी करून गेले असल्याची माहिती विक्रम डोईफोडे यांनी दिली आहे.