सरळगाव ते संगम रस्त्याची दुरावस्था, प्रवाशांची हाडे खिळखिळी

मुरलीधर दळवी
गुरुवार, 10 मे 2018

मुरबाड (ठाणे) - सरळगाव ते संगम रस्त्याची दुरावस्था झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या लोकांची हाडे खिळखिळी होत आहेत. या रस्त्यावर नवीन डांबर टाकून रस्ता सपाट करण्याची मागणी लोक करत आहेत.

संगम हे काळू व डोईफोडी नदीच्या संगमावर वसलेले तीर्थक्षेत्र आहे. मुरबाड, कल्याण, शहापूर तालुक्यातील लोक येथे दशक्रिया, उत्तरकार्य, अस्थिविसर्जन तसेच लग्न कार्यासाठी नेहमीच मोठ्या संख्येने येत असतात. प्राचीन काळातील शिवमंदिरही येथे आहे. शेजारीच इतर मंदिरे आणि मठ आहेत.

सरळगाव ते संगम फाटा या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी टाकलेले खडी, डांबराने रस्त्यावर उंचवटे निर्माण झाले आहेत. प्रत्येक दहा पंधरा फुटावर उंचवटे असल्याने वाहनांची उचल आपट होऊन प्रवाशांची हाडे खिळखिळी होत आहेत. विशेषतः दुचाकी व तीनचाकी वाहनांना याचा फार त्रास होत आहे.

Web Title: Sargalgaon to Sangam Road is Deteriorate