मुंबई : म्युझिकल बँडने आळवले ‘आरे वाचवा!’चे सूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

save Aarey protest of forest Public awareness through music from Aarey Ki Band mumbai

मुंबई : म्युझिकल बँडने आळवले ‘आरे वाचवा!’चे सूर

मुंबई : आरे जंगल वाचवण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात नागरिकांचा सहभाग वाढत आहे. ‘आरे की बँड’कडून संगीताच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. या बँडने ‘आम्हा आरेची काळजी रे’ हे गाणे तयार केले असून या गाण्याच्या माध्यमातून ‘आरे वाचवा’ कॅम्पेन सुरू आहे. आरे परिसरात राहणाऱ्या व संगीताची आवड जोपासणाऱ्या तरुणांनी एकत्र येऊन ‘आरे की बँड’ची स्थापना केली आहे. यात संगीताची आवड असणाऱ्या २० जणांचा समावेश आहे. यात गिटार, हार्मोनियम, कहन बॉक्स प्लेयर आणि गायकांचा समावेश आहे. आरे परिसर, रेल्वे स्थानके, बस स्थानके यांमध्ये गाण्याच्या माध्यमांतून ‘आरे वाचवा’चा सूर छेडला असल्याचे निखिल वेडे याने सांगितले.

‘आरे वाचवा’चा नारा देत या तरुणांनी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष सुरू केला आहे; मात्र आपल्यात उपजत संगीताची कला असल्याने त्याचा वापरही यासाठी करायला हवा असे या तरुणांना वाटले. त्यानंतर रविवारच्या आंदोलनात पहिल्यांदा ‘आरे की बँड’ने आपले सदरीकरण केले. उपस्थित लोकांना त्यांचा हा प्रयत्न आवडला. त्यांनीही प्रतिसाद दिल्याने तरुणांचा आत्मविश्वास दुणावला आहे. आरे परिसरात अनेक स्थानिक तरुण संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. तरुणांच्या या पथकामध्ये अनेक संगीत शिक्षक आहेत. त्यांनीच या ‘म्युझिकल प्रोटेस्ट’ची कल्पना मांडली. त्यानंतर साधारणतः २० तरुण आणि तरुणी एकत्र आल्या. त्यांनी एकत्र येत गाणे तयार केले. हे गाणे त्यांनी आरे तसेच मेट्रो रेल्वेमध्येदेखील वाजवले. काही लोकांनी त्याचा व्हिडीओ काढून तो समाज माध्यमांवर टाकल्याने प्रचंड हिट ठरला. त्यामुळे या कॅम्पेनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी होत असल्याचे सना खान हिने सांगितले.

समाजमाध्यमांचा तुफान वापर

प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग घेण्याव्यतिरिक्त व्हॉट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक यासारख्या समाजमाध्यमांचादेखील वापर केला जात आहे. आरेचा लढा या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे. यासाठी ‘आरे की फाऊंडेशन’ हे पेजदेखील तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून आरे वाचवण्याचा लढा अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न असून तरुणांनी या लढ्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन कार्यकर्ती सृष्टी हिने केले आहे. विविध चळवळींना गाण्यांनी साथ दिल्याचा मोठा इतिहास आहे.

Web Title: Save Aarey Protest Of Forest Public Awareness Through Music From Aarey Ki Band Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top