नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर येथे संविधान बचाव आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

मुंबई : भाजप हटाव..देश बचाव...संविधान बचाव... देश बचाव...संविधान की शानमें राष्ट्रवादी काँग्रेस मैदानमें...मुर्दाबाद...मुर्दाबाद भाजप सरकार मुर्दाबाद...मनुवाद्यांना अटक करा...अटक करा अटक करा...मनुवाद्यांना अटक करा अशा गगनभेदी घोषणा देत चेंबूर येथे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज जोरदार आंदोलन केले.

दिल्लीमध्ये समाजकंटकांनी संविधान जाळल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर येथे हे आंदोलन करण्यात आले. चेंबूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजप सरकार आणि मनुवादयांना अटक करण्याची मागणी करण्यात आली शिवाय संविधान जाळणाऱ्यांना फाशी दया अशीही जोरदार मागणी करत मोर्चेकरांनी निषेधही केला.यावेळी मनुस्मृतीचे दहनही करण्यात आले.

संविधान जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. बाबासाहेबांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आजपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. जोपर्यंत त्यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभर अशी आंदोलने सुरुच राहितील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावेळी दिला.

यावेळी मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष सुनील शिंदे, पक्षाचे नेते शिवाजीराव नलावडे, रविंद्र पवार आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: save constitution agitation under nawab malika leadership in chembur