शिवसेना हिंदुत्वावर ठाम :  संजय राऊत यांचे मोठं विधान वाचा संपुर्ण बातमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

देश आणि राज्य टिकवायचे असल्यास प्रत्येकाने निर्भीडपणे व्यक्त व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. 6) केले.

मुंबई : देश आणि राज्य टिकवायचे असल्यास प्रत्येकाने निर्भीडपणे व्यक्त व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. 6) केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार भवनात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. 

घडाळ्याच्या काट्यावर चालणारे मुंबईकर पांडुरंगाच्या वारीत

पत्रकार दिनाचे औचित्य साधून खासदार संजय राऊत यांच्या हस्ते पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या वेळी "सकाळ'चे वार्ताहर तेजस वाघमारे यांना शिवनेरकार विश्‍वनाथ वाबळे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या समारंभाला मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, विश्‍वस्त प्रकाश कुळकर्णी, वैजयंती कुळकर्णी-आपटे, अजेय वैद्य, आमदार सुनील प्रभू, प्रकाश सुर्वे आदी उपस्थित होते. 

#Positive ऑपरेशन मुस्कानमुळे 10 हजार बालकांची घरवापसी

राज्यात आणि देशात काही वर्षांपासून अस्वस्थता आहे. देशाचे सर्वेसर्वा असलेल्यांनी माध्यमे हातात घेतली आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. मराठी वृत्तपत्रांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. नैराश्‍यात असलेल्या महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर मराठी वृत्तपत्रांत काय छापून आले आहे याबाबत देशात उत्सुकता असते, असे ते म्हणाले. वाचकांच्या पत्रांचे सदर आणि अग्रलेख बंद होतील, त्यावेळी वृत्तपत्रे रसातळाला जातील, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

मुंबईची तहान भागवणार हे प्रकल्प , वाचा संपुर्ण बातमी

या समारंभात शिवनेरकार विश्‍वनाथ वाबळे पुरस्काराने "सकाळ'चे वार्ताहर तेजस वाघमारे यांना सन्मानित करण्यात आले. अप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार एबीपी माझा वाहिनीच्या मनश्री पाठक यांना, तर जयहिंद प्रकाशन पुरस्कार सदानंद खोपकर आणि गुणाजी कार्जिडेकर यांना प्रदान करण्यात आला. कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार जयू भाटकर यांना, विद्याधर गोखले ललित लेखन पुरस्कार संजीवनी खेर यांना आणि रमेश भोगटे पुरस्कार एबीपी माझा वाहिनीचे वैभव परब यांना देण्यात आला. 

शिवसेना हिंदुत्वावर ठाम 
हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे, असे राऊत म्हणाले. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच अयोध्येला जाण्याची तारीख निश्‍चित करतील, अशी माहिती त्यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य महान आहे. असे असताना केंद्र सरकार त्यांना भारतरत्न का देत नाही, असा सवाल त्यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Save the country says Sanjay Raut