अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर बुडणाऱ्या महिलेला वाचविले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

मुंबई : अर्नाळा समुद्र किनारी बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यात जीवरक्षकाला यश आले आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी सहलीसाठी आलेली महिला समुद्रात पोहत असताना दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास भरतीच्या लाटेत वाहून गेली. मात्र, येथे उभ्या जीवरक्षकासह स्थानिक नागरिक पीटर थाटू व जोएल तपेली या कोळीबांधवांनी प्रसंगावधान राखून तत्काळ समुद्रातून सदर महिलेला बाहेर काढले.

रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबई, ठाणे तसेच वसई, विरार व नालासोपाऱ्यातील अनेक पर्यटकांनी अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर गर्दी केली होती. दुपारी भरतीच्या पाण्याचा आनंद घेतानाच एक महिला पाण्यात वाहून गेली होती.

महिलेला वाचविण्याचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, गत रविवारीसुद्धा अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर तिघे बुडाले होते. त्यातील एकाचा जीव वाचला; तर दोन जणांचा मृत्यू झाला होता. आज वाचलेल्या महिलेचे नाव समजू शकले नाही. 

समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांनी अतिउत्साहीपणात समुद्राच्या पाण्यात उतरू नये, असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. पण, पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करून पाण्यात उतरतात. आज सुदैवाने महिलेचा जीव वाचविण्यात यश आले. सध्या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पर्यटकांनी आनंद घ्यावा, पण स्वतःची काळजीही घ्यावी.
- आप्पासाहेब लेंगरे,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अर्नाळा सागरी पोलिस ठाणे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Save a women at Arnala Beach