हृदयविकार असलेल्या मुलाला जीवदान    

हृदयविकार असलेल्या मुलाला जीवदान    

मुंबई - दुर्मिळ हृदयविकार असलेल्या धुळे येथील तेजस अहिरे या नऊ वर्षांच्या मुलाचा जीव वाचवण्यात मुंबई सेंट्रल येथील वोक्‍हार्ट रुग्णालयातील डॉक्‍टरांना यश आले आहे. छातीला छेद न देता सल्लागार बालशल्यचिकित्सक डॉ. सुरेश जोशी आणि इंटरव्हेन्शनल पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. मनीष चोखंद्रे यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली. या पद्धतीची पश्‍चिम भारतातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा वोक्‍हार्ट रुग्णालयाने केला आहे. 

तेजस अहिरे या बालकाला जन्मतःच हृदयविकार होता. तो एक वर्षाचा असताना या आजाराचे निदान झाले. ‘ब्लू बेबी’ म्हणून जन्माला आलेल्या तेजसवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु, त्यानंतरही त्याला सतत धाप लागत होती. त्याचे वजनही वाढत नव्हते. त्याच्या शरीरातील महाधमन्यांची अदलाबदल झाल्याचे तपासणी केल्यानंतर समजले. त्याच्या हृदयाच्या दोन कप्प्यांत दोन मोठी छिद्रे असून, फुफ्फुसांना योग्यप्रकारे रक्तपुरवठा होत नसल्याचेही समोर आले. त्याच्यावर कमी खर्चात उपचार करण्याचा निर्णय डॉक्‍टरांनी घेतला.  तेजसवर ‘ग्लेन शंट’ आणि त्यानंतर ‘फाँटान’ शस्त्रक्रिया किंवा ‘युनिव्हेंट्रिक्‍युलर पाथवे’ शस्त्रक्रिया करणे हेच पर्याय उपलब्ध होते, असे बालशल्यचिकित्सक डॉ. सुरेश जोशी यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात त्याच्या शरीराच्या खालच्या भागाकडून फुफ्फुसांकडे रक्त वाहून नेण्यासाठी नळी जोडण्यात आली. 

पहिल्या टप्प्यानंतर सहा महिन्यांनी इंटरव्हेन्शनल पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. मनीष चोखंद्रे यांनी कॅथलॅबमध्ये ‘फाँटान’ प्रक्रिया पार पाडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com