पाकिस्तान मुर्दाबाद बोला अन् 10 टक्के डिस्काऊंट मिळवा

say pakistan murdabad and get 10 percent off on lucky tawa hotel
say pakistan murdabad and get 10 percent off on lucky tawa hotel

मुंबईः जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले. दहशतवादी हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये पाकिस्तानविरोधात प्रचंड संताप आहेत. ठिकठिकाणी पाकिस्तानचे झेंडे जाळून निषेध व्यक्त करत आहेत. एका हॉटेल चालकाने पाकिस्तान मुर्दाबाद बोला अन् 10 टक्के डिस्काऊंट मिळवा, अशी योजना राबविली असून, सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामामधील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. भ्याड हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाल्यानंतर देशात संतापाचे वातावरण पसरले. देशातील प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने या हल्ल्याचा निषेध नोंदवत आहे. यासाठी सोशल मीडियाचाही वापर केला जात आहे.

खाद्यपदार्थांचा स्टॉल लावणाऱ्या अंजल सिंह या फेरीवाल्याने पाकिस्तानच्या निषेधासाठी अनोखा मार्ग अवलंबला आहे. या स्टॉलवर येणाऱ्यांसाठी त्यांनी खास ऑफर ठेवली आहे. 'पाकिस्तान मुर्दाबाद' बोला अन् चीकन लेग पीसवर 10 रुपये मिळवा अशी ऑफर आहे. लकी तवा या हॉटेल चालकाने 'पाकिस्तान मुर्दाबाद' बोला अन् 10 टक्के डिस्काऊंट मिळवा, अशी ऑफर सुरू केली आहे. ऑफर सुरू केल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात छायाचित्रे व्हायरल होऊ लागली आहे.

नवी मुंबईतील खारगर येथील लकी तवाचे मालक शायद खान म्हणाले, 'पाकिस्तान मुर्दाबाद'चा नारा देणाऱया प्रत्येक ग्राहकाला 10 टक्के डिस्काऊंट देतो. ग्राहक पाकिस्तानचा निषेध करत आहे.' छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील जगदालपूर शहरात अंजल सिंह यांची हातगाडी आहे. ते म्हणाले, 'पाकिस्तानला माणुसकीची किंमत नाही आणि त्यांना ती कधी कळणारही नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com