'एसबीआय'ला 7 हजार 718 कोटींचा तोटा

कैलास रेडीज
मंगळवार, 22 मे 2018

मुंबई - बुडीत कर्जे, बॉण्डची सुमार कामगिरी आणि सहयोगी बँकांचा भार सांभाळणाऱ्या भारतीय स्टेट बँकेला (एसबीआय) 31 मार्च रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत 7 हजार 718 कोटींचा तोटा झाला आहे. मंगळवारी येथे एसबीआयने आर्थिक वर्ष 2017-18 ची आकडेवारी जाहिर केली. 

देशातील मोठी बँक असलेल्या एसबीआयच्या बुडीत कर्जामध्ये गेल्या वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्षात बँकेने बुडीत कर्जांकरिता 66 हजार 58 कोटींची तरतूद केली. बॅँकेला वर्षभरात 2 लाख 65 हजार 100 कोटिंचा महसूल मिळाला असून यात गतवर्षीच्या तुलनेत किरकोळ घट झाली. चौथ्या तिमाहीत बँकेला 7 हजार 718 कोटींचा तोटा झाला. या तिमाहीत 23 हजार 601 कोटींची तरतूद केली. चौथ्या तिमाहीत बँकेला 68 हजार 436 कोटींचा महसूल मिळाला असून 15 हजार 883 कोटींचा परिचालन नफा झाल्याचे बँकेने म्हटले आहे. 

ऊर्जा, पोलाद आणि बांधकाम आदी पायाभूत सेवा क्षेत्रात बँकेने मोठ्या प्रमाणात कर्जे दिली असून त्यातील अनेक बुडीत खात्यात गेली आहेत.

Web Title: SBI loses 7 thousand 718 crores