esakal | राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील नियुक्त्यांच्या नावाखाली 400 कोटींचा गैरव्यवहार; चौकशीसाठी फडणवीसांचं ठाकरेंना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील नियुक्त्यांच्या नावाखाली 400 कोटींचा गैरव्यवहार; चौकशीसाठी फडणवीसांचं ठाकरेंना पत्र

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा एक पत्र लिहिलं आहे.

राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील नियुक्त्यांच्या नावाखाली 400 कोटींचा गैरव्यवहार; चौकशीसाठी फडणवीसांचं ठाकरेंना पत्र

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या नियुक्त्यांमध्ये तब्बल चारशे कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला आहे. केंद्राकडून सरकारला प्राप्त होत असलेल्या निधीतून राज्य सरकार राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी करत असते. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

NHM म्हणजेच नॅशनल हेल्थ मिशन ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्राच्या निधीतून आणि राज्य सरकारमार्फत योजना राबवली जाते. राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या नियुक्त्यांमध्ये तब्बल चारशे कोटींचा गौरव्यवहार झाल्याचं फडणवीसांनी आपल्या पत्रामध्ये लिहिलं आहे. याबाबतचे पुरावे म्हणून फडणवीसांनी आपल्या पत्रासोबत तीन ऑडिओ क्लिप्स देखील जोडल्या आहेत.

महत्त्वाची बातमी हिंदुत्व समजून घेण्याची ठाकरेंची बौद्धिक कुवत नाही; भाजप अध्यात्मिक आघाडीची टीका

ऑडिओ स्वरूपातील पुरावेही दिलेत : 

या ऑडिओ क्लिप पुराव्यानुसार राज्यात कंत्राटीपध्दतीने जे कामगार सध्या काम करतायत त्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घेण्यासाठी एक लाख ते अडीच लाखांपर्यंत पैसे गोळा केले जात आहेत असा त्यामध्ये संदर्भ आहे. राज्यात सुमारे वीस हजार असे उमेदवार आहेत. यासाठी तब्बल चारशे कोटींचं कलेक्शन होते आहे. याची मुख्यमंत्र्यानी सखोल चौकशी करून हे सारं कुणाच्या आशीर्वादाने सुरु आहे हेही समोर येणं महत्त्वाचं असल्याचं फडणवीस म्हणालेत. 

कर्ज काढून भारतायत पैसे  : 

या प्रक्रियेसाठी उमेदवाराकडून ५०० रुपये लढा निधी सोबतच  १ रुपयांचे सहमतीपत्र गोळा करून अर्जावर स्वाक्षरी घेतली जाते. मात्र त्यासोबत एका वेगळ्या पाकिटात पाचशे किंवा दोन हजारांच्या नोटांच्या स्वरूपात एक वेगळा लिफाफा देण्यास सांगितलं जात आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे काही लोकांनी हे पैसे भरण्यासाठी कर्ज देखील घेतल्याचं समजतंय. 

महत्त्वाची बातमी तुला थोबडवणार...मराठीची चिड येते म्हणणाऱ्या कुमार सानूच्या मुलाला मनसेचा इशारा

या पैशांसाठी काही खास बँक खाती बनवण्यात आली आहेत म्हणूनच हे सर्व गंभीर असल्याचं फडणवीस म्हणालेत. केवळ एका अभियानात सेवेतील कायम नियुक्तीसाठी अशापद्धतीने 400 कोटींची भ्रष्टाचार होत असेल तर आरोग्य क्षेत्रात किती मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत आहे, याची कल्पनाही न केलेली बरी असं देखील फडणवीसांनी म्हंटल आहे. 

scam of 400 crore in national health mission fadanavis write letter to cm thackeray

loading image