नवी मुंबईत मुसळधार, पावसाच्या पाण्यात अडकली स्कुलबस

कालपासून मुंबई आणि उपनगरांत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साठले आहे.
mumbai rain update
mumbai rain update
Summary

कालपासून मुंबई आणि उपनगरांत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साठले आहे.

मुंबई - उपनगरात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे वाहतूकीला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, नवी मुंबईतही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं मुंबईतील अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचलं आहे. दरम्यान, या पाण्यात एक स्कुलबस अडकली असल्याची माहिती मिळत आहे. या बसला बाहेर काढण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. (mumbai rain update)

mumbai rain update
Mumbai Rain Alert: पावसाच्या फटक्यानंतर विस्कळीत झालेली लोकल सेवा हळूहळू रुळावर

कालपासून मुंबई आणि उपनगरांत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साठले आहे. मुंबईतील काही भागात मुसळधार पाऊस कोसळला असून पावसाची सतंतधार सुरु आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास पावसाने काहीशी विश्रांती घेतली आणि साचलेले पाणी ओसरायला सुरुवात झाली. मात्र, सकाळी पुन्हा पाऊस बरसू लागला आणि शाळा-महाविद्यालयात निघालेल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे.

पुढील चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत मुंबईत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज कुलाबा केंद्रातून वर्तवण्यात आला होता. त्यानुसार, सोमवारी रात्री मुंबईत मुसळधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली.

mumbai rain update
कोकणात मुसळधार : 7 तासानंतर राजापुरातील पुराचे पाणी ओसरले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com