शालेय जीवनातच विदेशी भाषांचे शिक्षण

School days learning foreign languages
School days learning foreign languages

विद्यार्थ्यांना फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, चीनी भाषा शिकण्याची संधी
मुंबई - विदेशी भाषांचे भाषांतर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाषांतरकारांची आवश्‍यकता आहे. विदेशी भाषांचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा, यासाठी माध्यमिक शाळेतच विद्यार्थ्यांना आता विदेशी भाषेचे शिक्षण उपलब्ध करून देण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरण २०१९ च्या मसुद्यामध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार विदेशी भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना भाषेचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

भारतीयांना विदेशी भाषेत उत्तम भविष्य घडविण्याची संधी मिळाल्याने अनेक जण करिअर म्हणून विदेशी भाषा शिकत आहेत. देशभरातील विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण देत आहेत. या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच विदेशी भाषा शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरणात केली आहे. त्याप्रमाणे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, चायनीज, जापनीज अशा भाषा शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विदेशी भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण सुरू असतानाच भाषा शिकता येणार आहे; परंतु त्रिभाषीय सूत्र लागू असणाऱ्या शाळांमध्ये विदेशी भाषेचा त्रिभाषा म्हणून समावेश करता येणार नसल्याची शिफारस करण्यात आली आहे.

संस्कृत भारती आणि अलायन्स फ्रॅन्चाईज या संस्था भारतात अनेक वर्षांपासून संस्कृत आणि फ्रेंच भाषा शिकवत आहेत. विदेशी भाषेला प्राधान्य देत असतानाच धोरणामध्ये भारतीय भाषांनाही स्थान दिले आहे. भारतीय भाषांमध्ये सहावी ते आठवीदरम्यान देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांला एक अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शब्दसंपदा, भाषांमधील समानता आणि फरक, लिपी आणि व्याकरण यांचा अभ्यास विद्यार्थी करतील. यासह विविध भाषांच्या साहित्याचा अभ्यासही विद्यार्थ्यांना करता येणार असून यामधून भारतीय संस्कृतीचे सामर्थ्य विद्यार्थ्यांना समजणार असल्याचा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.

भाषांबाबत आणखी शिफारशी
संस्कृत भाषेचे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कालिदास आणि भास यांची नाटके यासह प्राचीन आणि मध्यकालीन साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश होणार आहे.

शास्त्रीय भाषेवर आधारित एक दोन वर्षांचा कोर्स विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते आठवीदरम्यान करावा लागणार आहे. किंवा विद्यापीठात शिक्षण घेत असतानाही विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा म्हणून शास्त्रशुद्ध पुराव्यावर आधारित शिक्षणाचा अंतर्भाव करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com