शुल्कासाठी खारघरमधील शाळेचा असाही प्रताप; ऑनलाईन शिक्षणच केले बंद...

गजानन चव्हाण
Thursday, 16 July 2020

खारघरच्या हार्मोनी शाळेतील दहावीच्या काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणा केला नाही म्हणून ऑनलाईन शिकवणीला बसू दिले जात नसल्यामुळे पालकांत संतापाचे वातावरण आहे.

खारघर : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे आणि शाळा सुरू झाल्याशिवाय शाळा व्यवस्थापनाने शुल्काची मागणी करू नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षणमंत्र्यांनी शाळांना दिलेल्या असतानाही खारघर सेक्टर 36 येथील हार्मोनी शाळेने दहावीत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण बंद केल्यामुळे पालक वर्गात संतापाचे वातावरण आहे.

अरे बापरे!  लॉकडाऊन काळात तणावासोबत वाढतोय संताप; 'हे' आहे मुख्य कारण..वाचा महत्वाची बातमी..

खारघरच्या हार्मोनी शाळेतील दहावीच्या काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणा केला नाही म्हणून ऑनलाईन शिकवणीला बसू दिले जात नसल्यामुळे पालकांत संतापाचे वातावरण आहे.

राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन

हार्मोनी शाळेत दोन वर्षांपासून माझी मुलगी शिक्षण घेत आहे. ती सध्या दहावीत आहे. तिला शाळेकडून ऑनलाईन शिक्षण दिल्या जाणाऱ्या ग्रुपमधून दोन दिवसांपूर्वी वगळण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे काम बंद असल्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्नपूर्ती सोसायटीतील आम्ही काही पालकांनी शाळा व्यवस्थापनाची भेट घेऊन समस्या निदर्शनास आणून दिली होती. तरीही शाळेकडून मुलीचे ऑनलाईन शिक्षण बंद केले आहे.
- प्रदीप भोसले, पालक

कोणत्याही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवू नये, अशा सूचना सर्व शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. काही अडचण असेल तर पालकांनी शिक्षकांऐवजी शाळा प्रशासनासी संपर्क साधावा.
- मीना तंबी, प्राचार्य, हार्मोनी स्कूल खारघर

---
संपादन :  ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school does not allowed students to attend online education amid school fees not paid