

Punishment Ban in school
ESakal
पनवेल : ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ ही जुनी म्हण आता केवळ इतिहासात जमा होणार आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक छळ हा गंभीर गुन्हा ठरवत महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी १३ डिसेंबर रोजी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शिक्षकांबरोबरच संस्थाचालकांवरही थेट फौजदारी कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.