दैव बलवत्तर म्हणून वाचले 47 विद्यार्थ्यांचे जीव

भगवान खैरनार
गुरुवार, 19 जुलै 2018

मोखाडा : तालुक्यातील शेलमपाडा जिल्हापरिषद शाळेच्या दोन वर्गखोल्या मंगळवारी रात्री मुसळधार पावसामूळे कोसळल्या आहेत. त्यामूळे सद्यस्थितीत एका समाजमंदिरात विद्यार्थ्यांची तात्पूर्ती शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही घटणा रात्री उशीरा घडल्याने 47 विद्यार्थी बचावले आहेत. या दुर्घटनेमुळे जि.प.बांधकाम विभाग आणि शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

मोखाडा : तालुक्यातील शेलमपाडा जिल्हापरिषद शाळेच्या दोन वर्गखोल्या मंगळवारी रात्री मुसळधार पावसामूळे कोसळल्या आहेत. त्यामूळे सद्यस्थितीत एका समाजमंदिरात विद्यार्थ्यांची तात्पूर्ती शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही घटणा रात्री उशीरा घडल्याने 47 विद्यार्थी बचावले आहेत. या दुर्घटनेमुळे जि.प.बांधकाम विभाग आणि शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

तालुक्यातील 38 शाळा धोकादायक आहेत. मात्र असे असतानाही या शाळा आजही दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. मागील आर्थिक वर्षात शाळा दुरूस्तीवर एकट्या मोखाडा तालुक्यात 1 कोटी 32 लाख 88 हजार 668 रूपये एवढा निधी खर्च होवूनही मोखाड्यातील कमकुवत शाळा अतिवृष्टीमुळे मोडून पडत आहे. एवढी भयानक परिस्थिती जिल्हा परिषद शाळांची होऊन बसली आहे.

शेलमपाडा जिल्हापरिषद शाळेच्या दुरूस्तीबाबत सन 2015 सालापासून पत्रव्यहार करून पाठपुरावा करण्यात येत असल्याचे केंद्रप्रमूख घनशाम कांबळे यांनी सांगीतले. असे असतानाही ही शाळा दुरूस्तीपासून वंचित राहिली आहे. तर अनावश्यक शाळा दुरूस्ती करून त्यावर लाखो रूपये खर्च केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

'सकाळ'ने वर्तवला होता अंदाज 
मोखाड्यातील 38 शाळा धोकादायक या मथळ्याखाली 'सकाळ'ने 29 जूनला बातमी प्रसिद्ध केली होती. तसेच जिल्हा परिषद प्रशासनाला जागे केले होते. मात्र, त्यावर जिल्हा परिषद आणि मोखाडा पंचायत समिती ने कुठलीही कार्यवाही न केल्याने शेलमपाडा येथील शाळेच्या दोन ईमारती कोसळल्या आहेत. 

जिल्हापरिषदेचे वरातीमागून घोडे
याबाबत प्रभारी गटशिक्षणाधिकारी रामचंद्र विशे यांच्याशी संपर्क साधला असता मागील वर्षी 28 शाळा मंजूर होत्या पैकी 17 शाळा दुरूस्त झाल्या आहेत. तर 7 शाळा प्रगतीपथावर असून चालू वर्षी 28 शाळा दुरूस्तीसाठी प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अतिधोकादायक शाळांबाबत त्यांना छेडले असता धोकादायक शाळा पाडण्याबाबत उशिराने प्रस्ताव आला असल्याची माहितीही विशे यांनी दिली आहे. यावर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मोखाडा तालुक्यातील शाळा दुरूस्ती साठी 1 कोटी 32 लाख 88 हजार 668रुपये एवढा निधी क्षेत्रफळापेक्षा जास्त देवूनही, अत्यावश्यक दुरूस्तीबाबत चालढकल करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाईचे आदेश देणार असल्याची माहिती जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती निलेश गंधे यांनी दिली आहे.  आमच्या शाळेची दुरूस्ती करण्याबाबत वारंवार लेखी पत्रव्यवहार तसेच पंचायत समिती सभापती यांनाही धोकादायक परिस्थितीची माहिती देवूनही आमची शाळा दुरूस्तीला पारखी राहिलेली आहे. सुदैवाने शाळा रात्री कोसळली आहे. मात्र दिवसा कोसळली असती तर विद्यार्थ्यांच्या जीवितहानी झाली असती, त्यास कोणाला जबाबदार धरले असते. असा खरमरीत सवाल शेलमपाडा येथील माजी सरपंच दिलीप जागले यांनी केला आहे.

Web Title: School wall collapses in mokhada