कोरोनाविरोधात लढा तीव्र! फळ, भाजी विक्रेत्यांचीही तपासणी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाविरोधात लढा तीव्र! फळ, भाजी विक्रेत्यांचीही तपासणी होणार

मुंबईत कोरोनाची साथ पसरु नये भाजी तसेच फळ विक्रेत्यांबरोबर औषध विक्रेत्यांची कोरोना तपासणी करण्याची सूचना समोर येत आहे. कोरोना रुग्णात अत्यावश्यक वस्तू विकणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने जास्त काळजी घेतली जात आहे. 

कोरोनाविरोधात लढा तीव्र! फळ, भाजी विक्रेत्यांचीही तपासणी होणार

मुंबई :मुंबईत कोरोनाची साथ पसरु नये भाजी तसेच फळ विक्रेत्यांबरोबर औषध विक्रेत्यांची कोरोना तपासणी करण्याची सूचना समोर येत आहे. कोरोना रुग्णात अत्यावश्यक वस्तू विकणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने जास्त काळजी घेतली जात आहे. 

वीजच नाही तर ऑनलाईन शिक्षण देणार कसे? शिक्षकांचा सवाल

बोरीवलीतील आय सी कॉलनीत फळे, भाजी  तसेच मासे विक्रेत्यांत सुरक्षित अंतर राहील याची खबरदारी घेतली जात आहे. अत्यावश्यक वस्तूंच्याच खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता यामुळे परिसरातील विक्रेत्यांची थर्मल तपासणी करण्याचा निर्णय झाला आहे.  अंधेरी असलेल्या के वॉर्डमध्ये रुग्ण गेल्या काही दिवसात वाढल्यामुळे फळ तसेच भाजी विक्रेत्यांबरोबरच किराणा दुकानदार तसेच औषध विक्रेत्यांची तपासणी करण्याचे ठरले आहे. लॉकडाऊन असताना याच व्यक्ती कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचा अंदाज काहींनी व्यक्त केला.

क्रेडिट कार्डच्या विळख्यात अडकले आहात ? अशी करा क्रेडिट कार्डच्या विख्यातून स्वतःची सुटका...

कुलाबा येथील एक बुजुर्ग परिसरातील दुकानदारांना दूरध्वनी करुन किराणा तसेच औषधे मागवून घेत होते. ते कथीही घराबाहेर पडले नाहीत, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली. त्याचाच अर्थ त्यांच्या घरी आणून दिलेल्या वस्तूंमुळे त्यांना कोरोनाची लागण झाली. वस्तू आणून दिलेल्या व्यक्तीसही कोरोना झाला होता, याकडे लक्ष वेधले जात आहे.

बाप्पाच्या आगमनाला अवघा दीड महिना शिल्लक पण गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची भूमिका अजूनही अस्पष्टच..

गोरेगाव परिसरात वाढत असलेल्या रुग्णात अपार्टमेंटमधील लोकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे., त्याचवेळी झोपडपट्टीतील रुग्ण कमी होत आहेत. लॉकडाऊन कालावधीत अपार्टमेंट, इमारतीमधील व्यक्ती केवळ क्वचितच खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्या होत्या. त्यांनी किराणा सामान, भाजी, फळे तसेच औषधांची खरेदी केली. त्यामुळे त्यांची तपासणी आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :Goregaon