सागरी किनारा संरक्षण प्रकल्प सुरू करण्यास मान्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 एप्रिल 2018

मुंबई - शाश्वत सागर किनारा संरक्षण प्रकल्पांतर्गत माहीम, मरिन ड्राइव्ह, गणपतीपुळे आदी ठिकाणच्या समुद्रकिनारा संरक्षण प्रकल्पाला मान्यता देऊन सदर काम प्राधान्याने सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाची 73 वी बैठक मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे संपन्न झाली, त्या वेळी ते बोलत होते. बैठकीस राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री यांनी सागरकिनारा संरक्षण प्रकल्पासाठी एशियन डेव्हलपमेंट बॅंकेकडून 643.50 कोटी रुपये इतके कर्ज घेण्यास मान्यता दिली.
महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाच्या रुपये 321 कोटींच्या वार्षिक अर्थसंकल्पास (बजेट) मान्यता दिली. तसेच मुंबई- मांडवा (अलिबाग) रो-रो सेवा प्रकल्पाचा आढावा घेतला व प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करावे, हा प्रकल्प सुरू झाल्यास होणाऱ्या संभाव्य वाहतूकवाढीच्या अनुषंगाने वाहतुकीचे नियोजन करावे, पार्किंगची व्यवस्था करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या. तसेच, कोस्ट गार्डला डहाणू येथे जेटी उभारण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच, विविध ठिकाणच्या जेटी प्रकल्पांनाही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

Web Title: sea beach security project permission devendra fadnavis