गुटखा विक्री करणारी 81 दुकाने सील 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

मुंबई - गुटखाविक्री करणाऱ्या तब्बल 81 दुकानांना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सील ठोकले आहे. या कारवाईत 15 लाखा गुटखा जप्त करण्यात आला. ही राज्यभरात राबवण्यात येणार आहे. 

एफडीएने नळबाजार, डोंगरी, धारावी, साकीनाका, चेंबूर, कुर्ला या भागांत दोन दिवस कारवाई केली. यासाठी 18 पथके तयार केली होती. या धडक मोहिमेत 89 जणांविरोधात कारवाई करण्यात आली. नळबाजार येथील सुगंधित तंबाखू उत्पादन करणाऱ्या कारखान्यालाही सील ठोकण्यात आले. एफडीएचे सहआयुक्त शैलेश आढाव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली. 

गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुपारी, खर्रा यांसारख्या आरोग्यास घातक असलेल्या अन्नपदार्थाची विक्री, साठवणूक, उत्पादन व वाहतुकीस प्रतिबंध आहे. गुटखाविरोधात राज्यभरात मोहीम सुरू राहणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली.

Web Title: Seal of 81 shops selling gutkha