esakal | पवईत श्वानावर बलात्कार! अत्याचारानंतर केले विकलांग; आरोपींचा शोध सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

पवईत श्वानावर बलात्कार! अत्याचारानंतर केले विकलांग; आरोपींचा शोध सुरू

पवईतील हिरानंदानी परिसरात श्वानावर बलात्कार केल्यानंतर तिच्या गुप्तागांमध्ये लाकडी पट्टी घसवून तिला विकलांग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पवईत श्वानावर बलात्कार! अत्याचारानंतर केले विकलांग; आरोपींचा शोध सुरू

sakal_logo
By
निलेश मोरे


घाटकोपर : पवईतील हिरानंदानी परिसरात श्वानावर बलात्कार केल्यानंतर तिच्या गुप्तागांमध्ये लाकडी पट्टी घसवून तिला विकलांग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्वानावर सध्या जोगेश्वरीतील प्राण्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. 

सुशांतसिंह राजपूत प्रकरण! पुण्यातून एकाला चरससह अटक

दरम्यान, या विकृत घटनेबद्दल प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केला असून आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. गुरुवारी (ता. 22) सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास बॉम्बे ऍनिमल राईट्‌स या प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या कार्यकर्त्या निहारीका गांधी यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. हिरानंदानी गार्डनजवळील गॅलरिया मॉल येथे ते काळजी घेत असलेल्या कुत्रीच्या लघवीच्या जागेतून मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह होत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ताबडतोब तिला जोगेश्वरीतील प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल केले.

अंबरनाथमध्ये पोलिसावर जीवघेणा हल्ला; चारही हल्लेखोर अर्ध्या तासांत जेरबंद

उपचारादरम्यान डॉक्‍टरांनी कुत्रीच्या योनीतून जवळपास सात इंचाची लाकडी पट्टी बाहेर काढली व तिच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर बॉम्बे ऍनिमल राईट्‌स या संस्थेचे सहसंस्थापक गितेन दुधानी यांनी श्वानाशी लैंगिक संभोग करून तिला क्रूरपणे विकलांग केल्याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसी टीव्हींच्या आधारे आरोपीचा शोध घेत असल्याचे पवई पोलिसांनी सांगितले आहे. 

श्‍वानाशी संभोग करून तिला क्रूरतेने वेदना दिली म्हणून त्याविरोधात मी पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्ही फुटेज तपासून गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. 
- गितेन दुधानी,
सहसंस्थापक, बॉम्बे ऍनिमल राईट्‌स 

The search for the dog abuser in Powai

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )