अखेर नाल्यात पडलेल्या दिव्यांशचा शोध थांबवला

divyansh
divyansh

मुंबई : नाल्यात पडलेल्या दिव्यांश सिंह या दिड वर्षाच्या मुलाचा अद्याप शोध लागलला नाही. आतापर्यंत विविध यंत्रणांच्या 150 कर्मचारी अधिकाऱ्यांनी दिव्यांशचा शोध घेतला. मात्र त्याला यश न आल्याने हा शोध आता थांबवला आहे.

बुधवारी (ता. 10) रात्री मालाड येथील उघड्या गटारात पडून वाहून गेलेल्या चिमुकल्या दिव्यांश सिंहचा शोध थांबवला. तब्बल 2 दिवस शोध घेऊनही दिव्यांश सापडला नाही. त्यामुळे 48 तास उलटून गेल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी दिव्यांशचा शोध थांबवला आहे. 

गेले 2 आठवडे मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नाले आणि गटार ओसंडून वाहात आहेत. अशा परिस्थितीत दिव्यांश नाल्यात पडल्याने त्याचे कुटूंब हतबल झाले आहे. त्याचबरोबर आपत्कालीन विभागाने शोधमोहिम थांबवल्याने या कुटूंबाकडे काहीच पर्याय राहिला नाही.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com