...अन्‌ मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, 'मी' आलोच तिकडे..!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

मागील चार दिवसांत सीवूड्‌स येथील एनआरआय इस्टेट परिसरातील पाणथळ जमिनीवर असलेली जवळपास ७०० झाडे जमीनदोस्त करण्यात आली. जनसुनावणी, सूचना न मागवता करण्यात आलेल्या या झाडांच्या कत्तलीविरोधात पर्यावरणप्रेमींनी आदित्य ठाकरे यांच्याकडे दाद मागितली आहे.

नवी मुंबई : मागील चार दिवसांत सीवूड्‌स येथील एनआरआय इस्टेट परिसरातील पाणथळ जमिनीवर असलेली जवळपास ७०० झाडे जमीनदोस्त करण्यात आली. जनसुनावणी, सूचना न मागवता करण्यात आलेल्या या झाडांच्या कत्तलीविरोधात पर्यावरणप्रेमींनी आदित्य ठाकरे यांच्याकडे दाद मागितली आहे. त्यावर ठाकरे यांनी रविवारी (ता.१९) या परिसराला भेट देऊन पाहणी करणार असल्याचे आश्‍वासन दिले. तसेच सिडको प्रशासनाला वृक्षतोडीचे सुरू असलेले काम तोपर्यंत थांबवण्याचे आदेश दिले. 

ही बातमी वाचली का? टीम इंडियाच्या वयस्कर चाहत्या चारुलता यांचे निधन

रविवारी (ता. १२) अचानक एनआरआय इस्टेट परिसरात सुरू झालेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या वेळी अनेकांनी नवी मुंबईत ‘आरे’ची पुनरावृत्ती होत असल्याचे मतही व्यक्त केले. याप्रकरणी नवी मुंबई महापालिका, एनआरआय पोलिस ठाण्यात दाद मागितली. याबाबत सिडको प्रशासनाकडेही विचारणा करण्यात आली. मात्र, कोणाकडूनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर तक्रारकर्ते सुनील अगरवाल व इतर पर्यावरणप्रेमींनी गुरुवारी (ता. १६) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.  यावेळी गोल्फ कोर्सचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सिडको प्रशासनामार्फत प्रकल्प रेटण्यासाठी केली जाणारी घाई, त्या संदर्भातील कागदपत्रे, संबंधित प्रशासनाशी वारंवार केलेला पत्रव्यवहार ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. 

ही बातमी वाचली का? सोनम कपूरला लंडनमध्ये का वाटली भिती?

अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश
पर्यावरणमंत्री ठाकरे यांनी सिडको प्रशासनाला वृक्षतोडीचे काम रविवारपर्यंत थांबवण्याचे आदेश दिले. तसेच रविवारी या ठिकाणची पाहणी करणार असल्याने सिडको व संबंधित इतर अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seawoods Deforestation Case in Environment Minister aaditya thackeray