22 लाख लाभार्थी शेतकरी; शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

मुंबई -ठाकरे सरकारच्या महत्त्वकांक्षी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी शनिवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील 28 जिल्ह्यातील 21 लाख 82 हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांचा समावेश आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या यादीत समावेश नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. 

मुंबई -ठाकरे सरकारच्या महत्त्वकांक्षी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी शनिवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील 28 जिल्ह्यातील 21 लाख 82 हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांचा समावेश आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या यादीत समावेश नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. 

मोठी बातमी - दाढीमुळे तुम्हाला आहे 'कोरोना' व्हायरसचा धोका ?

ठाकरे सरकारने ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज दोन लाख रुपयांपर्यंतचे आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची घोषणा नागपूरमध्ये पहिल्या अधिवेशनात केली होती. त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. पहिल्या यादीत 68 गावांतील 15,358 शेतकऱ्यांचा समावेश होता. प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा यामध्ये समावेश होता. योजनेअंतर्गत सुमारे 36 लाख 45 शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी अपेक्षा राज्य सरकारला आहे. त्यापैकी 34 लाख 98 हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती राज्य शासनाच्या पोर्टलवर अपलोड झाली आहे. त्यापैकी 21 लाख 82 हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना सुमारे चौदा हजार कोटींची कर्जे माफ होतील असा अंदाज आहे. त्यासाठीची आर्थिक तरतूद राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात करुन ठेवली आहे. राज्य शासनाने आतापर्यंत सुमारे 25 हजार कोटी रुपये शेतकरी कर्जमाफीसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. 

मोठी बातमी - समोरच्याला समजू न देता असे वाचा #WhatsApp वरचे मेसेज...

आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत 72,947 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर व्यापारी बॅंका 24 तासांमध्ये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका 72 तासांमध्ये संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमाफीचे लाभ देणार आहेत. 

दुसऱ्या यादीत राज्यातील 28 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. 15 जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर 13 जिल्ह्यातील अंशत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तूर्तास कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यांचा या दुसऱ्या यादीत समावेश नाही. त्यांना 29 मार्चनंतर निवडणुका संपल्यानंतर योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे.  

second list of farmers loan wavier announced by mahavikas aghadi 22 lacs farmers will get benefit


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: second list of farmers loan wavier announced by mahavikas aghadi 22 lacs farmers will get benefit