esakal | मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता महापालिकेचा मोठा निर्णय, युद्धपातळीवर सुरु केलंय काम....
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता महापालिकेचा मोठा निर्णय, युद्धपातळीवर सुरु केलंय काम....

बीकेसीतील दुसऱ्या टप्यातील रुग्णालय उभारण्याचे काम युद्धपातळीवर

मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता महापालिकेचा मोठा निर्णय, युद्धपातळीवर सुरु केलंय काम....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील दुसऱ्या टप्यातील कोविड 19 रुग्णालय उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या रुग्णालयात एक हजार खाटांपैकी 100 खाटांचा अतिदक्षता विभाग असेल. तर उर्वरित 900 खाटांपैकी काही ठिकाणी ऑक्सिजनपुरवठा यंत्रणादेखील असणार आहेत.    

मोठी बातमीएक कोरोनाबाधित रिक्षाचालक, तशीच चालवली १० दिवस रिक्षा, आता नागरिकांची तंतरली.. कुठे घडलाय 'हा' प्रकार..

कोरोनाचे मुंबईतील वाढते रुग्ण लक्षात घेऊन बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) 1008 खाटांचे रुग्णालय उभारल्यानंतर त्याच्याच शेजारी 12 जूनपर्यंत आणखी एक हजार खाटांची सुविधा असलेले अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचे काम वेगाने सुरु केले आहे. विशेष म्हणजे येथे अतिदक्षता विभागात 108 खाटा तर डायलिसीसच्या रुग्णांसाठी 20 डायलिसीस मशिन बसविण्यात येणार आहेत.

एमएमआरडीएने चीनमधील वुहान येथे जसे वेगाने रुग्णालय उभारले त्याच वेगाने एमएमआरडीचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी अवघ्या 15 दिवसात पहिल्या टप्प्यातील 1008 खाटांचे रुग्णालय उभे केले. याचे कौतुकही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

मोठी बातमी  शाब्बास मुंबई ! मुंबईत बरे होणाऱ्यांची संख्या विक्रमी, एका दिवसात इतके हजार गेलेत घरी

दुसऱ्या टप्प्यातील या रुग्णालयात एक हजार खाटांपैकी 100 खाटांचा अतिदक्षता विभाग असेल. तर उर्वरित 900 खाटांपैकी काही ठिकाणी ऑक्सिजनपुरवठा यंत्रणादेखील असेल. तसेच या रुग्णालयात गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्याची सुविधादेखील असेल असे एमएमआरडीएने सांगितले. या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालयाचे प्राथमिक टप्प्यातील काम सुरू झाले असून यासाठी पहिल्या रुग्णालयाप्रमाणेच सामग्रीचा वापर केला जाईल. अग्निप्रतिबंधक सामग्रीचा वापर, पावसाळ्यातदेखील टिकून राहणारी अशी ही सुविधा असेल असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. 

second phase of jumbo quarantine facility construction started at BKC