सेक्रेटेरियल प्रॅक्‍टिसचीही प्रश्‍नपत्रिका व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

मुंबई - बारावीच्या परीक्षेतील मराठीचा पेपर फुटल्याचा प्रकार ताजा असतानाच शनिवारी वाणिज्य शाखेच्या सेक्रेटेरियल प्रॅक्‍टिस (एसपी) या विषयाचा पेपर व्हॉट्‌सऍपवर व्हायरल झाल्याने उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची पुन्हा धांदल उडाली.

बारावीचा शनिवारी "एसपी' आणि भौतिकशास्त्र या विषयाचा पेपर होता. हे दोन्ही पेपर 11 वाजता सुरू होणार होते. परीक्षा मंडळाच्या नियमानुसार सकाळी 10.45 वाजता विद्यार्थ्यांना पेपर देण्यात आले. मात्र एसपी विषयाची प्रश्‍नपत्रिका 10 वाजून 47 मिनिटांनी वॉट्‌सऍपवर व्हायरल झाली. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असूनही हा प्रकार घडल्याने संबंधित परीक्षा केंद्रातील प्राध्यापकांसह कर्मचारीही संशयाच्या जाळ्यात आले आहेत. गेल्या वर्षी "बुक किपिंग' विषयाचा पेपर अशाच पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. परीक्षा मंडळाच्याच एका कर्मचाऱ्याने मंडळाच्या केंद्रापासून परीक्षा केंद्रात जाईपर्यंत ती प्रश्‍नपत्रिका व्हायरल केली होती, असे तपासात स्पष्ट झाले होते. परीक्षा मंडळाने त्या कर्मचाऱ्याला निलंबित केले होते.

Web Title: secretarial practice question paper viral