Mumbai : पतीच्या मृत्यूनंतर नोकरीसाठी विधवा पत्नीची धडपड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Semi-Government mumbai

Mumbai : पतीच्या मृत्यूनंतर नोकरीसाठी विधवा पत्नीची धडपड

मुंबई : निमशासकीय नोकरीवर असताना कुणाचा मृत्यू झाला तर, अनुकंपा तत्वावर जवळच्या व्यक्तीला नोकरी मिळण्याची तरतूद आहे. मात्र सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यालयात गेल्या दोन वर्षापासून एक विधवा महिला नोकरी मिळवण्यासाठी वणवण भटकत आहे. उंची कमी असल्याने नोकरी मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अनुकंपा तत्वाच्या या नियमामुळे चंद्रकला कांबळे यांच्यासह अनेक कुटुंबाचे भविष्य अंधारमय झाले आहे.

महेंद्र कांबळे हे एमएससीबीच्या विभागीय कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होते. जून २०२० मध्ये महेंद्र कांबळे यांना कोविडमुळे मृत्यू झाला. कोविड काळात कर्त्यव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांचे मृत्यू झाल्यास त्यांच्या पत्नीला/जवळत्या नातेवाईकांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याची तरतूद सुरक्षा मंडळाचे केली होती. महेंद्र यांच्या पत्नी चंद्रकला कांबळे आपल्या पतीच्या जागवेवर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्याकरिता सुरक्षा मंडळाच्या कार्यालयात अर्ज केला. मात्र नोकरी मिळविण्यासाठी लागणारी आवश्यक शारीरिक पात्रता नसल्याचे तिला मंडळाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता कुटुंबाचा गाडा कसा चालवावा हा प्रश्न चंद्रकला कांबळे यांच्यापुढे आहे.

प्रतिक्रीया

पतीच्या मृत्युनंतर संपूर्ण कुटूंबियांची जबाबदारी माझ्यावर आहे. दहा वर्षाच्या मुलीचे शिक्षण, म्हातारे आई वडीलांचा खर्च कसा करावा असे असंख्य प्रश्न माझ्यापुढे आहे. सरकारने माझ्या अडचणी समजून घेऊन सुरक्षा रक्षकाच्या ऐवजी दुसरे कुठलेही काम द्यावे,

चंद्रकला कांबळे, विधवा महिला

महिला शाररीक चाचणी मध्ये अपात्र असेल तर त्यांना जे काम करण्यास शक्य असेल असे काम मंडळात देण्यात यावे. जेणे करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहचा प्रश्न सुटेल असे शक्य नसल्यास सदर महिलेची मुलगी मोठी होईपर्यंत प्रती महिना त्यांना उदरनिर्वाहासाठी मंडळाकडून मानधन देण्यात यावे.

- अभिलाष डावरे, कामगार नेते

अनुकंपा तत्वावर सुरक्षा रक्षक पदाची नोकरी आम्ही शासनाच्या नियमानुसारच देत आहे. नियमानुसार त्या पदासाठी शारीरिक पात्रता आवश्यक असते.

अशोक डोके, अध्यक्ष, सुरक्षा रक्षक मंडळ

, बृहमुंबई ठाणे जिल्हा

काय असे शारीरिक पात्रता -

पुरुष सुरक्षा रक्षक

उंची १६२ सीमी

वजन - ५० किलो

महिला सुरक्षा रक्षक

उंची -१५५ सीमी

वजन - ४८

टॅग्स :MumbaiwomenjobEmployees