
Mumbai Crime: सुरक्षारक्षकाने 20व्या मजल्यावरून महिलेला ढकलले अन्...
मुंबई : मुंबईतील मालाड येथील एका महिलेला सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने २० व्या मजल्यावरून ढकलून दिल्याचा प्रकार घडला आहे. पण सुदैवाने या प्रसंगातूनही सदर महिला वाचली आहे. विसाव्या मजल्यावरून ढकलून दिल्यावर तिने १८ व्या मजल्यावरील घराच्या खिडकीला धरले होते. त्यानंतर त्या खिडकीचे ग्रील तोडून ती आत आल्याची माहिती समोर आली आहे.
(Mumbai Crime News)
अनिता भाले असं या महिलेचं नाव असून रागाच्या भरात सुरक्षारक्षकाने या महिलेला सोसायीटच्या २० व्या मजल्यावरून ढकलून दिलं होतं पण त्या महिलेने १८ व्या मजल्यावरील खिडकीला धरलं आणि नशीब बलवत्तर म्हणून या महिलेचा जीव वाचवला आहे. त्यानंतर पोलिसांकडूनआरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा: वेटलिफ्टिंगमध्ये भारताला दुसरं पदक जिंकून देणारा गुरूराजा पुजारी कोण?
दरम्यान, एका घरकाम करणाऱ्या अनिका भाले या घरकाम करणाऱ्या महिलेला काम देण्याचं निमित्त सांगून तो २०व्या मजल्यावर गेला होता. त्यानंतर त्या महिलेत आणि सुरक्षारक्षकामध्ये भांडणं झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुरक्षारक्षकाने महिलेचा गळा दाबून तिला ढकलून दिले. त्यानंतर त्या महिलेने खिडकीच्या ग्रिलला धरून आपला जीव वाचवला आहे. त्यानंतर सोसायटीतील लोकांकडून महिलेला खिडकीचं ग्रील तोडून आत घेण्यात आलं आहे.
Web Title: Security Guard Pushed The Woman From 20th Floor Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..