मासे चोरण्यासाठी सुरक्षारक्षकाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

मुंबई - पवई तलावातील मासे चोरी करण्यास विरोध करणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या सुपरवायझरची हत्या झाल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. शोएब सजाउल्ला खान (वय 50) असे मृताचे नाव आहे. हत्येप्रकरणी तबरेज खान आणि सलीम सिद्दिकी यांना पवई पोलिसांनी अटक केली. त्यांना बुधवारी (ता. 19) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पवईच्या तलावात महाराष्ट्र ऍगलिंग असोसिएशन बोट क्‍लब आहे.

तलावातील मासे चोरी होऊ नयेत यासाठी तेथे सुरक्षारक्षक असतात. तबरेज आणि सिद्धीकी तलावातून मासे चोरण्याचा प्रयत्न करायचे. बोट क्‍लबने समज देऊनही त्यांचे चोरीचे प्रयत्न सुरूच होते. सोमवारी (ता. 17) रात्री ते दोघे मासे चोरण्यासाठी आले होते. सुरक्षारक्षक आणि शोएब खान यांना त्यांनी चाकूचा धाक दाखवून बोटीने तलावात नेले. नंतर आरोपींनी खानला मारहाण करून चाकूने हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या खानला त्यांनी पाण्यात ढकलले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आज दुपारी खानचा मृतदेह तलावातून बाहेर काढला.

Web Title: security murder for fish theft