अंधेरी सॅटिसला सुरक्षेची गरज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

मुंबई - अंधेरीच्या मिनी सॅटिस पुलाच्या दुसऱ्या भागामुळे सध्या तेथील सुरक्षा व्यवस्थेला धोका उत्पन्न होण्याची भीती व्यक्त होत आहे. अंधेरी-पूर्वेच्या मुख्य रेल्वे पादचारी पुलाच्या दक्षिण भागात रिक्षा थेट वरपर्यंत येतील, असा मिनी सॅटिस आहे. त्याच्याच बरोबर समोर म्हणजे मुख्य पुलाच्या उत्तर भागाला दुचाकी गाड्या थेट वरपर्यंत येतील, असा छोटा जोडपूल आहे. अपंगांनाही या पुलाचा चांगला फायदा होऊ शकतो. मात्र, तेथून सध्या दुचाकींसह चारचाकी किंवा छोटा टेम्पो थेट रेल्वेस्थानकातील मुख्य पुलावर जाऊ शकतो, अशी स्थिती आहे. त्यामुळे दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबई - अंधेरीच्या मिनी सॅटिस पुलाच्या दुसऱ्या भागामुळे सध्या तेथील सुरक्षा व्यवस्थेला धोका उत्पन्न होण्याची भीती व्यक्त होत आहे. अंधेरी-पूर्वेच्या मुख्य रेल्वे पादचारी पुलाच्या दक्षिण भागात रिक्षा थेट वरपर्यंत येतील, असा मिनी सॅटिस आहे. त्याच्याच बरोबर समोर म्हणजे मुख्य पुलाच्या उत्तर भागाला दुचाकी गाड्या थेट वरपर्यंत येतील, असा छोटा जोडपूल आहे. अपंगांनाही या पुलाचा चांगला फायदा होऊ शकतो. मात्र, तेथून सध्या दुचाकींसह चारचाकी किंवा छोटा टेम्पो थेट रेल्वेस्थानकातील मुख्य पुलावर जाऊ शकतो, अशी स्थिती आहे. त्यामुळे दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच फ्रान्समध्ये झाला तसा घातपात होण्याची शक्‍यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

मेट्रो स्थानकाच्या खालील रस्त्यावरून छोटा जोडपूल सुरू होतो. तेथे उंच वाहनांना अडवणारा लोखंडी बीम सात फूट उंचीवर लावण्यात आला आहे. मात्र, तिथून हा जोडपूल रेल्वेस्थानकातील मुख्य पादचारी पुलाला जोडला आहे तेथपर्यंत कोठेही वाटेत वाहन प्रतिबंधक बॅरिकेडस्‌ लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्या बीमखालून कोणतेही छोटे वाहन किंवा मोठी मोटार या मार्गाने थेट वरपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे तिथे वाहनांना अडवतील असे भक्कम बॅरिकेड्‌स लावण्याची गरज आहे.

मुख्य पुलाच्या दक्षिण बाजूला रिक्षांसाठी सॅटिस आहे. जोडपूल जेथे मुख्य पुलाला मिळतो, तेथे बॅरिकेडस्‌ लावण्यात आले आहेत. दुसरे म्हणजे मुख्य रस्त्यावरून या जोडपुलापर्यंत येण्याचा मार्ग जेमतेम एक रिक्षा जाईल एवढाच रुंद आहे. या मार्गातून रिक्षा जेथे पुलावर चढू लागतात, तेथेच मोठ्या वाहनांना अडविणारी मोठी लोखंडी बीम सहा फूट उंचावर लावण्यात आली आहे. त्यामुळे तेथून अन्य वाहने येणेच जवळपास अशक्‍य आहे.

अपुरी सुरक्षा व्यवस्था
या मोटरसायकल मार्गाच्या सॅटिसबाबत तत्काळ सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे. सध्या या जोडपुलाच्या रस्त्याकडील भागावर पोलिस ठाण्याचे तात्पुरते हलवता येणारे बॅरिकेडस्‌ आहेत. मात्र, ते अपुरे असल्याने पुलाकडील बाजूला धातूचे कायमस्वरूपी मजबूत बॅरिकेडस्‌ लावणे गरजेचे आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळणे शक्‍य होणार आहे.

Web Title: Security needed to Andheri setisa