कॉलेजसाठी बाईक दिली नाही, मुलाने उचललं 'हे' भयानक पाऊल

कॉलेजसाठी बाईक दिली नाही, मुलाने उचललं 'हे' भयानक पाऊल

नवी मुंबई :  घटना हृदयाला चटका लाऊन जाणारी.  शाळा कॉलेज मधील मुलं हल्ली काय करतील याचा नेम नाही. या मुलाने तर अत्यंत टोकाचं पाऊल उचललंय. या 11 वीतल्या मुलाने आपलं आयुष्य संपवलंय. कारण ऐकाल तर तुम्ही देखील हैराण व्हाल. 

वडिलांनी कॉलेजमध्ये जाण्यासाठी मोटरसायकल दिली नाही म्हणून 11 वी सायन्सच्या विद्यार्थ्याने कळंबोलीतील नवीन सुधागड हायस्कूलमध्ये जाऊन स्वतःला जाळून घेतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शिवम दीपक यादव (17) असे स्वतःला जाळून घेतलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

या घटनेत शिवम 90 टक्के भाजला असून त्याला पुढील उपचारासाठी ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 
शिवमचे वडील दीपक यादव हे मुंबई पोलीस दलात नागपाडा मोटर परिवहन विभागात चालक म्हणून कार्यरत आहेत.

दीपक यादव हे कळंबोलीतील अमरदीप सोसायटीत कुटुंबासह राहण्यास आहेत. त्यांचा मुलगा शिवम हा कळंबोलीतील न्यू सुधागड हायस्कूलमध्ये इयत्ता अकरावी सायन्सचे शिक्षण घेत आहे. शिवम शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे न्यू सुधागड  हायस्कूलमध्ये जाण्यासाठी तयार झाल्यानंतर त्याने आपल्या वडिलांकडे शाळेत जाण्यासाठी मोटरसायकलची मागणी केली. मात्र, दीपक यादव यांनी त्याला मोटरसायकल देण्यास नकार दिला. त्यामुळे शिवम रागाच्या भरात न्यू सुधागड हायस्कूलमध्ये गेला. त्यानंतर त्याने शाळेतील दुसऱ्या मजल्यावरील शौचालयात जाऊन स्वतःला पेटवून घेतले.

यानंतर  तो त्याच अवस्थेत शौचालयातून बाहेर आला. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी त्याला गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, या घटनेत शिवम 90 टक्के भाजला गेल्याने त्याला पुढील उपचारासाठी ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांनी दिली.

सदर घटना पाहता मुलं आणि पालक यांच्यातील दुरावा वाढत चाललाय हेच  अधोरेखित होतंय.  

WebTitle : see what eleventh science student did because his father refused to give bike to go to college

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com