महाविकास आघाडीला रोखण्यासाठी गणेश नाईकांची खेळी..

महाविकास आघाडीला रोखण्यासाठी गणेश नाईकांची खेळी..

नवी मुंबई : राज्याप्रमाणेच नवी मुंबई महापालिका निवडणुकीतही होऊ घातलेली महाविकास आघाडीचे वातावरण निष्प्रभ करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपकडून जुनीच खेळी खेळली जात आहे. मागील 28 वर्षे मालमत्ता व पाणी करात वाढ न केलेल्या महापालिकेने पुढील 25 वर्षेही मालमत्ता व पाणी करात वाढ न करण्याचे आश्‍वासन भाजपतर्फे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी दिले आहे.

याआधीच्या निवडणुकांमध्येही नाईकांनी करवाढ न करण्याचे आश्‍वासन नवी मुंबईकरांना दिले होते. 
एप्रिल 2020 मध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. सध्या महापालिका नाईक कुटुंबीयांच्या हाती असून, मागील पालिकेची 28 वर्षांची कारकीर्द पाहिली असता, नाईक कुटुंब वरचढ राहिले आहे. मात्र, मागील काही महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या नाट्यमय राजकीय सत्तापालटामुळे प्रस्थापित नाईकांना महाविकास आघाडीचे आव्हान उभे राहिले आहे. नाईकांना महापालिकेपासून रोखण्यासाठी राज्याच्या धर्तीवर कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकत्र येऊ पाहत आहेत.

नवी मुंबईतही राज्याप्रमाणे मविआचे वातावरण निर्माण झाले आहे. हे वातावरण तयार झाल्यास पालिका निवडणूक भाजपत आलेल्या नाईकांना महाग पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पालिकेवर विजयी पताका कायम ठेवण्यासाठी नाईकांनी मालमत्ता कर व पाणी करातून सूट देण्याची जुनी खेळी नव्याने खेळली आहे.

2025 पर्यंत मालमत्ता कर आणि पाणी पट्टीत कोणतीही वाढ होणार नाही. नवी मुंबई पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे सल्लागार आणि गणेश नाईक यांच्या सूचनेनुसारच मागील 20 वर्षांत नवी मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादण्यात आलेली नाही, असा दावा नाईक समर्थकांनी केला. आता पुढील पाच वर्षेदेखील नागरिकांना निश्‍चिंत ठेवण्यासाठी पुढील 25 वर्षांसाठी नवी मुबईकरांची करवाढीतून मुक्तता होणार असल्याचा दावा नाईकांकडून करण्यात आला आहे. 

नाईकांच्या मार्गदर्शनामुळे पुरस्कार 

आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता हाकणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक मानाच्या पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. घनकचरा व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, मोरबे धरणाच्या माध्यमातून जलसंपन्नता, सक्षम पायाभूत सुविधा, कॉंक्रीटीकरणाचे रस्ते, नाला व्हिजन, शिक्षण व्हिजन, थीम पार्क या विषयांतील नवी मुंबईचा विकासाचा पॅटर्न अन्य शहरांनी अनुसरला आहे. राज्यात प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर आणि देशात सातव्या क्रमांकाचे स्वच्छ शहराचा सन्मान या शहराला प्राप्त झाला आहे. 

see what ganesh naik did to beat maharashtra vikas aaghadi in forthcoming elections

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com