सी.डी.देशमुखांच्या गावाची ऊर्जा कार्यक्षम मोहिमेत निवड! कोकण विभागातील एकमेव गाव

सुनील पाटकर
Wednesday, 21 October 2020

केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या आदर्श ऊर्जा कार्यक्षम ग्राम मोहिमेमध्ये रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्‍यातील नाते गावाची निवड करण्यात आली आहे. नाते गाव रिझर्व्ह बॅंकेचे पाहिले गव्हर्नर व देशाचे माजी अर्थमंत्री सी. डी. देशमुख व माजी केंद्रीय मंत्री मोहन धारीया यांचे जन्म गाव म्हणून ओळखले जाते.

महाड  ः केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या आदर्श ऊर्जा कार्यक्षम ग्राम मोहिमेमध्ये रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्‍यातील नाते गावाची निवड करण्यात आली आहे. नाते गाव रिझर्व्ह बॅंकेचे पाहिले गव्हर्नर व देशाचे माजी अर्थमंत्री सी. डी. देशमुख व माजी केंद्रीय मंत्री मोहन धारीया यांचे जन्म गाव म्हणून ओळखले जाते. पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नाने कोकण विभागातून नाते गावाला हा बहुमान मिळाला आहे. 

 नाथाभाऊंच्या सोडचिठ्ठीनंतर मुंबई भाजपचा बडा नेता पक्ष सोडणार ?

केंद्र सरकारच्या माध्यमातून देशपातळीवर ऊर्जा बचतीसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आदर्श ऊर्जा कार्यक्षम ग्राम मोहिमेचा समावेश आहे. त्यानुसार राज्यांच्या पथ निर्देशित संस्थेमार्फत प्रकल्प राबविण्यात येत आहे. या माध्यमातून ऊर्जा बचतीसाठी नवीन ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाची प्रायोगिक तत्त्वावर तुलना केली जाणार आहे. केंद्र सरकारकडून सध्या ऊर्जेवर आधारित नवीन परिकल्पना साकारल्या जात असून, त्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत मिळत आहे. 
 NCP मधील एक मंत्री खडसेंसाठी पद सोडणार ? नाथाभाऊंना कोणतं पद किंवा खातं ? चर्चा तर होणारच !

 सौरऊर्जा प्रकल्प राबवणार 
नाते गावाचा आदर्श ऊर्जा कार्यक्षम ग्राम मोहिमेत समावेश व्हावा, यासाठी आमदार डावखरे यांच्याकडून प्रयत्न केले जात होते. त्याला यश आले. या निर्णयामुळे गावातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, आरोग्य केंद्रे, ग्राम सचिवालये आणि इतर शासकीय कार्यालये सौर ऊर्जा युक्त केली जाणार आहेत. 

Selection of Nate village for schem on energy club project 

( संपादन ः रोशन मोरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selection of Nate village for schem on energy club