डोंबिवलीत सोसायट्यांमध्ये स्वयंशिस्तीचे पालन 

शर्मिला वाळुंज
मंगळवार, 7 एप्रिल 2020

डोंबिवलीत कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असतानादेखील नागरिक खोटेनाटे कारण सांगून बाहेर बिनधास्त फिरतानाचे चित्र एकीकडे दिसत असले, तरी दुसरीकडे डोंबिवलीतील काही सोसायट्यांनी मात्र कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सोसायट्या स्वतः सील करुन वेगळा आदर्श निर्माण केला आहे. अत्यावश्‍यक सेवेसाठी केवळ काही तासांची मुभा देऊन इतर वेळेस सोसायट्यांचे गेट लॉक केले जात असून कोणालाही विनाकारण बाहेर फिरण्याची परवानगी दिली जात नाही. तसेच दूध, भाजीची गाडी सोसायटीच्या दारात येत असल्याने नागरिकही या स्वयंशिस्तीचे काटेकोर पालन करताना दिसत आहे.

ठाणे : डोंबिवलीत कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असतानादेखील नागरिक खोटेनाटे कारण सांगून बाहेर बिनधास्त फिरतानाचे चित्र एकीकडे दिसत असले, तरी दुसरीकडे डोंबिवलीतील काही सोसायट्यांनी मात्र कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सोसायट्या स्वतः सील करुन वेगळा आदर्श निर्माण केला आहे. अत्यावश्‍यक सेवेसाठी केवळ काही तासांची मुभा देऊन इतर वेळेस सोसायट्यांचे गेट लॉक केले जात असून कोणालाही विनाकारण बाहेर फिरण्याची परवानगी दिली जात नाही. तसेच दूध, भाजीची गाडी सोसायटीच्या दारात येत असल्याने नागरिकही या स्वयंशिस्तीचे काटेकोर पालन करताना दिसत आहे. 

क्लिक करा : मुंब्रावासीयांना लॉकडाऊनचे गांभीर्यच नाही

डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. अनेक परिसर सील केले असतानादेखील नागरिकांमध्ये त्याविषयी गांर्भिय नसून काहीजण डॉक्‍टरच्या औषधांची जुनी पावती दाखवून मेडीकलसाठी बाहेर जात आहेत. भाजीपाला आणण्यासाठी एकाच घरातील दोन-तीन व्यक्ती बाहेर पडत आहेत, घरात कंटाळा आला म्हणून दूधाचे किंवा भाजीचे कारण सांगून परिसरात पाय मोकळे करणारेही काही महाभाग आहेत. प्रत्येकाला अडवणे पोलिसांना शक्‍य नसल्याने नागरिकांच्या बाहेर फिरण्यावर नियंत्रण आणण्यात अडचणी येत आहेत, तर दुसरीकडे काही प्रभागातील सोसायट्यांनी डोंबिवलीकरांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

गोग्रासवाडी, जिजाईनगर परिसरातील सोसायट्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधत संचारबंदीदरम्यान योग्य ते नियोजन केले आहे. लोकप्रतिनिधींनीही त्यांच्या सूचनांनुसार त्यांना अत्यावश्‍यक सेवा सोसायटीच्या दारात मिळवून देण्याची सोय केल्याने नागरिक नियमांचे काटेकोर पालन करताना दिसतात.

येथील जिजाईनगर परिसरातील अनेक सोसायट्यांनी स्वतःच गेटला टाळे ठोकले आहे. अत्यावश्‍यक वस्तू आणण्यासाठी नागरिकांना सकाळी व सायंकाळी एक ते दोन तासांची वेळ ठरवून देण्यात आली आहे. तसेच भाजीपाल्याचीही एक गाडी लोकप्रतिनिधींना सांगून निश्‍चित केली आहे. हा भाजीपाला विक्रेता एक दिवसाआड प्रभागात येतो. प्रत्येक सोसायटीला वेळ ठरवून देण्यात आली असून योग्य ते अंतर राखून नागरिकही अत्यावश्‍यक असल्यास भाजी खरेदी करत आहेत. 

 

क्लिक करा : आम्हाला गावी जायचंय, मुंबईतील चाकरमानी लॉकडाऊन संपण्याच्या प्रतीक्षेत

    आमच्या सोसायटीमध्ये साधारण 78 खोल्या आहेत. कोरोनाचा फैलाव डोंबिवलीत पहाता आम्ही स्वतःच सोसायटीच्या गेटला टाळे लावले आहे. सकाळी 10 ते 12 व सायंकाळी 6 ते 7 ही वेळ नागरिकांना ठरवून दिली असून त्या वेळेत त्यांना मेडीकल किंवा इतर गोष्टींसाठी बाहेर जाता येईल. तसेच नगरसेविका सायली विचारे यांच्याशी बोलून त्यांनी सोसायट्यांना एक भाजीवाला नेमून दिला आहे. प्रत्येक सोसायटीला एक तासाची वेळ दिली असून त्या वेळेत तो भाजीविक्रेता एक दिवस आड सोसायटीच्या गेटवर येतो. 
- मंगेश सुर्वे, सेक्रेटरी,
श्री अनुपम सोसायटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Self-determination in societies at Dombiwali