सेल्फिटायटिसमुळे नात्यांमध्ये असुरक्षितपणा 

सेल्फिटायटिसमुळे नात्यांमध्ये असुरक्षितपणा 

मुंबई - स्मार्टफोनमुळे सर्वांनाच लागण होत असलेल्या सेल्फिटायटिस या आजारामुळे कुटुंबातील नात्यांमध्ये असुरक्षितपणा वाढला आहे. हे टाळण्यासाठी भावनिक जागरूकता निर्माण व्हायला हवी. इंटरनेटच्या माध्यमातून फसवणूक टाळण्यासाठी ठामपणे नकार द्यायला शिकले पाहिजे आणि स्वतःला जपण्यासाठी मानसिकदृष्ट्या खंबीर होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचे मत मत मानसोपचार तज्ज्ञ वरखा चुलानी यांनी व्यक्त केले. 

सायबर सिक्‍युरिटी या विषयावर "एचडीएफसी एरगो'ने आयोजित केलेल्या परिसंवादात त्या बोलत होत्या. आपल्याबाबतीत सायबर गुन्हे होऊ नयेत म्हणून आपण स्मार्टफोन योग्य पद्धतीने वापरण्याइतके स्मार्ट आहोत का, हा प्रश्‍नही स्वतःला विचारला पाहिजे, असे संगणक सुरक्षा तज्ज्ञ साकेत मोदी यांनी सांगितले. 

मुलांच्या नेटच्या वापराबाबत आपण मर्यादा ठरविल्या, तर त्याचा उपयोग होतो, घराबाहेरचे जग पाहण्यासाठीही पालकांनी मुलांना प्रोत्साहित करावे. दुसरे म्हणजे आपण ठाम नकार द्यायला लाजतो, पटकन अनोळखी व्यक्तींना पासवर्ड सांगून टाकतो, म्हणून असे सायबर गुन्हे होतात. हे टाळण्यासाठी आपण इमोशनली रेडी हवे, असेही चुलानी म्हणाल्या. 

प्रदर्शन करायची हौस बंद करा 
सतत आपले सेल्फी काढून किंवा कोठे फिरायला गेलो की त्याचे फोटो समाजमाध्यमांवर टाकण्याचा नवा आजार सेल्फिटायटिस याची लागण सर्वत्र होत आहे. आपल्याला प्रदर्शन करायची हौस असते, याबाबत पालकांचेच अनुकरण मुले करतात. यातूनच सायबर हल्ल्यांना सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला भावनिक जागृती (इमोशनल अवेअरनेस) येणे गरजेचे आहे. तुम्ही स्वतःला ओळखायला शिकलात की, दुसऱ्यांशी सतत सेल्फी काढून दुसऱ्यांबरोबर तुलना करण्याची अशी गरजच पडणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com