ठाण्यात सेना उमेदवाराचा पत्नीवर नारळ हल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मुंबई : ठाण्यात कोण, कुणाचा, कधी आणि कुठे बदला घेईल हे काही सांगता येत नाही. ठाण्यात अक्षरशः प्रचाराचा नारळ पत्नीला भिरकावून मारल्याचा विचित्र प्रकार रविवारी घडला आहे. शिवसेनेचे उमेदवार माणिक पाटील यांनी पत्नीला प्रचाराचा नारळ भिरकावून मारला. पत्नी संगीता पाटील या शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका. त्या या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत.

श्रीनगर परिसरातील प्रभाग 16 मधील शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी प्रभागातील उमेदवार माणिक पाटील, गुरुमितसिंग स्यान आणि डॉ. जितेंद्र वाघ उपस्थित असतानाच शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका संगीता पाटील घटनास्थळी आल्या. इतकी वर्ष होतात कुठे असा प्रश्न आपलेच पतीपरमेश्वर माणिक पाटील यांना संगीता यांनी विचारताच शाब्दिक चकमकीचा अंक तिथे पार पडला. त्यानंतर माणिक पाटील यांना संताप अनावर होऊन त्यांनी पत्नी संगीता यांच्यावर प्रचाराचा नारळ भिरकावून मारला.

ठाण्याच्या श्रीनगर परिसरात प्रभाग- मधूनशिवसेनेने माणिक पाटील याना उमेदवारी दिली. तर विद्यमान नगरसेविका संगीता पाटील याना उमेदवारी देण्यात आली नाही. दरम्यान, माणिक पाटील आणि संगीता पाटील हे पती-पत्नी असून दोघांमध्ये असलेला वाद हा सर्वाना परिचित आहे. त्यांचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. अनेक परस्परविरोधी तक्रारी यापूर्वी अनेकवेळा करण्यात आल्या आहेत.

दरम्यान पती-पत्नीचा वाद हा विकोपाला गेला असून संगीता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता पती माणिक पाटील यांच्याकडून आपल्याला अनेक धमक्‍या आणि धमकीचे संदेश देण्यात आल्याचे संगीता पाटील यांनी सांगितले. या प्रकारामुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून प्रत्यक्ष मतदानापर्यंत काय काय होईल याचीच चर्चा शहरात सर्वत्र होताना दिसत आहे.

Web Title: sena candidate attacks wife with coconut