जेष्ठ सुलेखनकार कमल शेडगे यांचं निधन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

कमल शेडगे यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय.

मुंबई : ज्या काळात कॅलिग्राफी हा शब्दही ऐकिवात नव्हता तेंव्हापासून कॅलिग्राफी करणारे. अनेक मराठी नाटकं, विविध जाहिराती, ज्यांच्या वळणदार लेखणीतून साकारणारे असे महाराष्ट्रातीकल जेष्ठ सुलेखनकार कमल शेडगे यांचं निधन झालंय.

मुंबईतील गिरगावात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडीलही इंग्रजी दैनिकांची शीर्षके बनवण्याचे काम करत असत. त्याच्याच पावलावर पाऊल कमल शेडगे यांनी सुलेखन क्षेत्रात पदार्पण केलं. कमल शेडगे यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. कमल शेडगे यांच्या जाण्याने कला क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जातेय.  

मोठी बातमी - मुख्यमंत्री आणि पवारांच्या भेटीनंतर मोठा बदल, मुंबई पोलिसांनी घेतला आपला निर्णय मागे..

नटसम्राट, गोष्ट जन्मांतरीची, सूर्याची पिल्ले, काचेचा चंद्र, जंगली कबूतर, गगनभेदी, रायगडाला जेंव्हा जाग येते, गारंबीचा बापू, ऑल द बेस्ट, ती फुलराणी, स्वामी, वस्त्रहरण, प्रेमा तुझा रंग कसा, या आणि अशा अनेक मराठी नाटकांच्या जाहिरातींचं सुलेखन त्यांनीच केलं होतं. 

( अधिक माहिती घेऊन बातमी अपडेट होत आहे  )

senior calligraphy artist kamal shedge passes away at the age of 85

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: senior calligraphy artist kamal shedge passes away at the age of 85