ज्येष्ठ साहित्यिक अनुराधा पाटील यांना  विंदा करंदीकर पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

भाषा अभ्यासक प्रा. आर. विवेकानंद गोपाळ, भाषा संवर्धक अनिल गोरे यांचाही सन्मान

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या अनुराधा पाटील यांना या वर्षीचा विंदा करंदीकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार प्रा. आर. विवेकानंद गोपाळ व मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार अनिल गोरे यांना जाहीर झाला आहे. मराठी साहित्य निर्मितीमध्ये लक्षणीय कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या श्री. पु. भागवत पुरस्कारासाठी पद्मगंधा प्रकाशनाची (पुणे) निवड करण्यात आली.

चेंजिंग रुममध्येच तिने बसवला 'तिसरा डोळा' आणि म्हणाली 'ड्रेस ट्राय करो'...

समकालीन मराठी कवितेच्या क्षेत्रात प्रभाव निर्माण करणाऱ्या प्रतिभासंपन्न कवयित्री म्हणून अनुराधा पाटील यांनी स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत त्यांच्या 224 कविता प्रकाशित झाल्या आहेत. पद्मगंधा प्रकाशनने 1988 पासून मराठी साहित्यात दर्जेदार पुस्तके प्रसिद्ध केली. 32 वर्षांच्या त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना श्री. पु. भागवत पुरस्काराने गौरवण्यात येत आहे.

 'हे' ११ नगरसेवक करणार राष्ट्रवादीत घरवापसी; गणेश नाईकांना मोठा धक्का.. 

विंदा करंदीकर पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह; तर श्री. पु. भागवत पुरस्काराचे स्वरूप रुपये तीन लाख, मानपत्र आणि मानचिन्ह असे आहे. हे सर्व पुरस्कार मराठी भाषा दिनी, 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रदान करण्यात येतील. 

विंदा करंदीकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही माझा व माझ्या कवितेचा फार मोठा सन्मान आहे. नुकताच मला साहित्य अकदामी पुरस्कार मिळाला आणि आता राज्य सरकारच्या पुरस्काराची घोषणा झाली. हा पुरस्कार मला जाहीर होणे अगदीच अनपेक्षित होते. त्यामुळे भारावून गेले आहे. 
- अनुराधा पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior literary Anuradha Patil announces Vinda Karandikar Award