मिरासदार तरल मनाचे कार्यकर्तेही 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

मुंबई - सहा दशकांहून अधिक काळ निखळ विनोदाच्या जोरावर रसिकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी नव्वदी पार केली. ते लेखक आहेत तसेच तरल मनाचे कार्यकर्तेही असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ज्येष्ठ साहित्यकार द. मा. मिरासदार यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, सांस्कृतिक कार्य व शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, भाजपचे प्रवक्‍ते माधव भंडारी आदी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, मिरासदार यांना प्रसंगाचे भान किती आहे हे आज त्यांनी राजकारण्यांवरचे विनोद सांगून आम्हाला चिमटे काढले यावरून कळते. 

ज्येष्ठ साहित्यिकांचे सत्कार हे सुसंस्कृत राज्याचे कर्तव्य आहे. याची सुरुवात माझ्यापासून झाल्याचा आनंद वाटतो. दु:ख दोन गोष्टीने विसरणे शक्‍य आहे. एक म्हणजे तत्त्वज्ञान आणि दुसरे म्हणजे विनोद.
- द. मा. मिरासदार, ज्येष्ठ साहित्यिक.

Web Title: Senior literary dancer Mirasdar