ज्येष्ठ गायक पंडित शरद जांभेकर यांचे निधन... 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

पंडित शरद जांभेकर हे मुंबई आकाशवाणी केंद्रात दीर्घकाळ निर्माते म्हणून कार्यरत होते. शास्त्रीय, सुगम, नाट्य या प्रकारांमध्ये त्यांची विशेष पकड होती. शरद जांभेकरांनी अनेक दिग्गज गायकांना गाण्यांमध्ये कोरस म्हणून साथही दिली होती.

मुंबई :  'रवि मी हा चंद्र कसा', 'चंदनाचे परिमळ आम्हां काय', 'होतो द्वारकाभुवनी', 'अष्टविनायका तुझा महिमा कसा' अशा गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ गायक पंडित शरद जांभेकर (वय 81) यांचे लीलावती रुग्णालयात सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक संगीत नाटकांमध्ये त्यांनी कामे केली. त्यांचे संगीत सौभद्र नाटकातील 'राधाधर मधु मिलिंद' हे नाट्यगीत विशेष गाजले.
 
नागरिकांनो सजग राहा.. सायबर गुन्हेगारीत वाढ; राज्यात 'इतके' गुन्हे दाखल...

पंडित शरद जांभेकर हे मुंबई आकाशवाणी केंद्रात दीर्घकाळ निर्माते म्हणून कार्यरत होते. शास्त्रीय, सुगम, नाट्य या प्रकारांमध्ये त्यांची विशेष पकड होती. शरद जांभेकरांनी अनेक दिग्गज गायकांना गाण्यांमध्ये कोरस म्हणून साथही दिली होती. त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका गाजल्या आहेत. संगीताचार्य पं. द. वि. काणेबुवांकडून त्यांना तालीम मिळाली. आग्रा गायकीमध्ये अनेक राग ठराविक पद्धतीने गायले जातात. 

बाळ रडले अन् 'ती' जाहिरात कायद्याच्या कचाट्यात आली...

काणेबुवाही अगदी त्या ठराविक पद्धतीनेच ते राग शिकवत. त्यामुळे ते तसेच गळ्यावर चढायचे. डोळस पद्धतीने गाण ऐकायला आणि मग ते गायला काणेबुवांनी जांभेकर यांना शिकवले.  जांभेकर आकाशवाणी सांगली व मुंबई येथे नोकरी करून निवृत्त झाले होते. शास्त्रीय संगीताचा त्यांचा गाढा अभ्यास होता.

मुंबई पोलिस आयुक्तांचं नागरिकांसाठी खास ट्विट, केलं हे आवाहन...

'राधाधर मधुमिलींद जयजय', 'साध्यनसे मुनी कन्या', 'हृदयिं धरा हा बोध', 'कर हा करीं धरिला', 'गंगा आली रे अंगणी', 'तारिल तुज अंबिका', 'दे हाता या शरणगता',' तुझ्या विना भाव न' आदी त्यांच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध आहेत.  खडा आवाजाची देणगी असल्याने हिंदी व मराठी संगीतकारांबरोबर काम केले होते. संगीताचार्य पं. द वि काणेबुवांचे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. त्यांची सुरुवात 21 फेब्रुवारी 2020 ला पं. शरद जांभेकर यांच्या गायनाने झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: senior singer pandit sharad jambhekar passed away