मेट्रो कारशेडसाठी जागेचा शोध सुरूच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

सेवा सुरू होण्यास विलंबाची शक्‍यता; प्रकल्‍पांचे काम पूर्णत्‍वाकडे

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) मुंबई आणि उपनगरांत मेट्रोची कामे सुरू असली, तरी मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी अजूनही जमीन मिळालेली नाही. परिणामी प्रत्यक्षात मेट्रो सुरू होण्यास उशीर होऊ शकतो, असे एमएमआरडीए अधिकारीच सांगत आहेत. मुंबई महानगरात सुरू असलेल्या मेट्रोच्या पाच कामांपैकी २०२० च्या मध्यापर्यंत दोन कामे पूर्ण होतील, असा अंदाज आहे.

या प्रकरणी दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने जमिनीच्या हस्तांतराला तात्पुरती स्थगिती दिली आहे. दरम्यान, एमएमआरडीएचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबतची भूमिका लवकरच प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात सादर करणार आहे.
 

यांत्रिक कामांचा खोळंबा
मेट्रो कारशेडअभावी यांत्रिक कामे (मेकॅनिकल वर्क) सुरू होणे अवघड आहे. त्यामुळे मेट्रो सुरू होण्यासाठी कारशेड उभारणे गरजेचे आहे. असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या पाच कामांपैकी दोन प्रकल्पांचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seraching land for new metro car shed